वासुदेव भिल यांची जि.प. सदस्यपदी बिनविरोध निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

चिमठाणे गट पोटनिवडणूक : पिरन ठाकरे यांची माघार

 
 
शिंदखेडा, २८ मार्च :
धुळे जि.प.च्या चिमठाणे गटाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार वासुदेव भिल यांची जि.प. सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणेज, ते सर्वात तरूण सदस्य ठरले आहेत.
 
 
या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी माघारीची मुदत होती. अपक्ष उमेदवार पिरन जालम ठाकरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने वासुदेव भिल यांची बिनविरोध निवड झाल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम महाजन यांनी जाहीर केले.
वासुदेव भिल हे जरी अपक्ष निवडून आले असले तरी भाजपाचे त्यांना पूर्ण समर्थन होते. बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा तहसील कार्यालयाच्या आवारात सत्कार करत जल्लोष केला. यावेळी भाजपाचे जि.प. सदस्य कामराज निकम, पं.स. सदस्य दरबार गिरासे, डॉ. दीपक बोरसे, नगरसेवक राहुल कचवे उपस्थित होते.
 
 
तरूण जि.प. सदस्य
वासुदेव भिल सध्या शिंदखेडा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्यांचे वय २३ वर्षे आहे. ते सर्वात तरूण जि.प. सदस्य ठरले आहेत. विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील होते. वासुदेव यांच्या निवडीची अधिकृत घोषणा ७ एप्रिल रोजी होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@