समांतर रस्ते कृती समिती आंदोलनात पथनाट्याद्वारे मनसेचे प्रयोग

    17-Nov-2018
Total Views | 23

उपोषण स्थळी महापौर, मंत्री, खासदार, आमदार, पक्षाध्यक्ष यांच्या भेटी

 
जळगाव, १७ नोव्हेंबर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समांतर रस्ता कृती समितीतर्फे सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणात शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वराज निर्माण सेना व प्रबोधन संस्था या संघटनांनी सहभाग नोंदविला. मनसेतर्फे उपस्थित जिल्हाभरातील प्रमुख व्यक्तींमध्ये ऍड.जयप्रकाश बाविस्कर, जमिल देशपांडे, विलास राजपूत, अशोक पाटील, विलास बडगुजर, दिलीप पवार, विनोद पाटील, रीना सालवी महिला सेना, कल्पेश खैरनार, मयुरी पाटील ,उमेश काळे, भक्ती कुलकर्णी, सरिता चौधरी, संदीप पाटील, संदीप मांडोळे, महेश सपकाळे, सागर महाडिक, ललित सोनवणे, गणेश शेटे, सुशील इंगळे, उमेशसिंग राजपूत, जयंत वाणी,किरण नाथ, भूषण कोल्हे, हितेश बागुल, चंद्रकांत पाटील, हर्षल चौधरी, नंदू जाधव, रुचिरा कामदार, रूपाली कोळी,संतोष पाटील, राहुल तळेले, छगनराव मोरे, किरण महाजन, विकी कोळी, किशोर सोनी, अशोक शिंदे, चंदन सुरतवाला, राहुल निकम यांचा सहभाग होता.
 
 
महिलांनी मनसे स्टाईल येणार्‍या-जाणार्‍या व्यक्तींना स्वाक्षरीसाठी प्रोत्साहित केले. पथनाट्याद्वारेही याबाबत जागृती करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधील प्रवाशांनीही रस्त्यासाठी नाव लिहून स्वाक्षर्‍या केल्या.
 
 उपोषणात शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पथनाट्याद्वारे जागृती करताना.
 
उपोषणस्थळी राज्याचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील, खा.ए. टी. नाना पाटील, चोपड्याचे आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, यावलचे आ. हरिभाऊ जावळे, जळगावच्या महापौर सीमा भोळे, बांधकाम व्यवसायिक श्रीराम खटोड़, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र अल्पसंख्यांक अध्यक्ष गफ्फार मलिक, नगरसेवक भगत बालाणी यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या.
 
 
खा. ए. टी. नाना पाटील यांनी याप्रकरणी माहिती घेऊन आठ ते दहा दिवसाच्या आत समांतर रस्ता प्रकरणी टेंडर प्रक्रियेला सुरुवात होईल असे आश्वासन दिले. राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर सीमा भोळे, गफ्फार मलिक यांनी मनोगत व्यक्त केले. तिसर्‍या दिवशीही अनेक संस्थांनी पाठिंब्याचे पत्र कृती समितीकडे दिले.
 
आ. सोनवणे यांना आले गहिवरून
आ. चंद्रकांत सोनवणे यांना बोलतांना ़त्यांचा तरुण मुलगा आकाशची आठवण आल्याने त्यांना गहिवरून आले. ते काही काळ स्तब्ध राहिले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121