औरंगाबाद : “मोर्चे काढून आणि आंदोलन करून आरक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करू नका.” असे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. फुलंब्री विधानसभा मतदार संघातील सावंगी गावात विविध रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा शनिवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.
“सरकारकडून मोठी कायदेशीर फळी उभी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या बाजूने सकारात्मक अहवाल तयार करण्यात आला आहे. आंदोलने आणि मोर्चे काढून मराठा आरक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करू नका.” असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा समाजाने सहकार्य करावे, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/