‘रन फॉर युनिटी’ मध्ये सहभागी व्हा: पंतप्रधान मोदी

    28-Oct-2018
Total Views |



नवी दिल्ली: “३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्मृतिदिन आहे. याच दिवशी जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे अनावरण करण्यात येणार आहे. हा दिवस देशवासियांसाठी खास असेल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या ‘रन फॉर युनिटी’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून सांगितले.

 

यावेळी त्यांनी मन की बात मधून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले “२७ जानेवारी १९४७ रोजी ‘टाइम्स मॅगझिन’ने प्रकाशित केलेल्या अंकाच्या पहिल्या पानावर सरदार पटेलांचा फोटो होता. त्यात त्यांनी पटेल यांच्या कार्याचा गौरव केला होता. अत्यंत कठीण प्रसंगातही पटेल यांनी भारताला एकसंघ राखण्याचे काम केलं. राज्यांना जोडण्याचे काम गांधीजींनी पटेलांवर सोपवलं होते आणि या अत्यंत जटील कामात ते यशस्वी झाले होते.”

 

सरदार वल्लभभाई पटेल यांची ३१ ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी आहे. याचे औचित्य साधून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा दिवस भारतीयांसाठी खास दिवस असेल.” असेही त्यांनी सांगितले. ११ नोव्हेंबरला जागतिक महायुद्धाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. यावरही मोदींनी भाष्य केले. तसेच दिवाळी, भाऊबीज, धनत्रयोदशी आणि छठपुजेनिमित्त मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/