Paper Weight

कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी झालेल्यांमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ, अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई हो

Read More

मिठी नदीच्या गाळातून उपसले अकराशे कोटींचे ‘लोणी’ ; भ्रष्टाचाराची 20 वर्षे; समुद्राला आलिंगन देणार्‍या नदीची प्रदूषणाला ‘मिठी’

‘मिठी’ ही मुंबईतील चार प्रमुख नद्यांपैकी एक. एकेकाळी तिला मुंबईचे वैभव मानले जायचे. पण, तिची आजची अवस्था पाहिली, की काळजात चर्रर्र होते. दि. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत आलेल्या महापुरानंतर मिठी नदी पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. मात्र, आज दोन दशकांनंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. याउलट मिठी नदीतून गाळ उपसण्याच्या नावाखाली जवळपास अकराशे कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. या भ्रष्टाचारात नेमके किती जणांचे हात माखले आहेत, सलग 20 वर्षे सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणारा ‘आका’ कोण यांसह या प्रकरण

Read More

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे.

Read More

नदीजोड प्रकल्पांना जागतिक बँकाच्या अर्थसहाय्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नारपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजनेला वित्तीयसहाय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक, कोरियन एक्झिम बँक व एएफडी यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रकल्पांच्या वित्तीय सहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Read More

यमुना स्वच्छतेच्या प्रश्नावर केजरीवालांनी तोडले तारे!

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आम आदमी पक्ष केवळ आणि केवळ रडीचा डाव खेळत असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच यमुना नदीच्या स्वच्छतेवर भाष्य करताना केजरीवालांनी आणखी एक अर्तक्य विधान केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले की दिल्लीच्या लोकांना हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधून पाणी प्यायला मिळतं. यमुना ही हरियाणातून दिल्लीमध्ये येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुना नदीत विष कालवल्यामुळे ती प्रदूषित केल्याचा अजब दावा केजरीवालांनी केला आहे. या संदर्भात कुठलाही पुरावा सादर न करता, केजरीवाल

Read More

मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण

मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प- पॅकेज चार अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने २.६० मीटर व्यास असलेल्या भूमिगत मलजल बोगद्याचे खणन हाती घेतले आहे. बापट नाला आणि सफेद पूल नाल्यापासून धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पापर्यंत हा बोगदा तयार करण्यात येत आहे. एकूण तीन टप्प्यांत हे काम होत आहे. त्यापैकी दुसऱ्या टप्प्यातील मलजल बोगद्याचे ‘ब्रेक-थ्रू’ कनाकिया झिलिऑन (सांताक्रूझ– चेंबूर जोडरस्ता), लाल बहादूर शास्त्री मार्ग येथे बुधवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी यशस्वीपणे प

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121