अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईसाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवार, १० जुलै रोजी विधानसभेत सादर केले. यामुळे संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाईसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
Read More
भायखळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवार, १० जुलै रोजी विधान परिषदेत केली.
काही लोक राजकारणासाठी मराठी-हिंदी वाद पेटवत आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी एक अस्त्र म्हणून मराठी भाषेचा वापर केला जात असून हे दुर्दैवी आहे, अशी टीका गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे बंधूंवर केली. शुक्रवार, ४ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मीरारोडच्या परराज्यातील हिंदी भाषिक हॉटेल मालकाला झालेल्या मारहाणीचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत. दरम्यान या घटनेवर महाराष्ट्राचे गृहमंत्री यागेश कदम यांनी हॉटेल मालकाला सज्जड दम देताना म्हणाले की, “महाराष्ट्रात राहतोस तर तूला मराठी बोलता यायलाच हवी, येत नाही वैगरे महाराष्ट्रात एकून घेतले जाणार नाही. येत नसेल तर शिकण्याचा प्रयत्न कर.” असा दम मंत्री कदम यांनी दुकान मालकाला दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पोलिसांचे मानसिक आरोग्य, निवास आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष लक्ष पोलिसांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, तसेच त्यांच्या निवास सुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ५० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून दोनदा, तर ४० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून एकदा आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासोबतच पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि निवासाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २ जुलै रोजी विधानपरिषदेत सांगितले.
स्वयंपुनर्विकासाचा विषय पुढे जावा, योजनेकारिता पैसे उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली ‘दरेकर समिती’ नेमली. हे जबाबदारीचे शिवधनुष्य आहे. जनतेचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून अपार कष्ट करत मी महाराष्ट्राचा दौरा केला, बैठका घेतल्या. ३१३ पानांचा अहवाल तयार असून त्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर पुढील आठवड्यात सरकारला सादर करू, अशी माहिती भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष व दरेकर समितीचे प्रमुख आ.प्रविण दरेकर यांनी दि.२९ जून रोजी दिली.
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांची सलग तिसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. दिनो मोरिया आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला.
नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल रात्री पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी कुठल्याही पक्षाशी संबंधित असला तरी राजकारण विरहित त्याच्यावर कारवाई होईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. मंगळवार, २७ मे रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Dr. Narendra Kadam नाना कला आणि विद्यांचा वापर समाजसेवेसाठी करत, जनसेवा करणार्या डॉ. नरेंद्र कदम यांच्याविषयी...
देशात सध्या दलित हिताच्या नावाखाली काही घटक समाजात तेढ पसरविण्यात आघाडीवर आहे. अशा घटकांचा अजेंडा वेळीच ओळखणे आवश्यक आहे, असे मत लेख आणि कायद्याचे अभ्यासक गुरूप्रसाद पासवान यांनी शनिवारी व्यक्त केले.
राज्यभरात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत राज ठाकरेंना मोलाचा सल्ला दिला आहे.
जर दिशा सालियानच्या आईवडीलांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे तर आदित्य ठाकरेंचीदेखील नार्कोटेस्ट व्हायला हवी. त्यानंतर दुध का दुध पानी का पानी होईल, अशी मागणी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
MLA ram kadam on kunal kamra कुणाल कामराने उबाठा गटाची सुपारी घेतली! आमदार राम कदम यांचा गौप्यस्फोट
( Police found guilty in drug cases will be dismissed Minister Yogesh Kadam ) राज्य शासनाने ड्रग्सविरोधी कारवाईत झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत ड्रग्ज रॅकेटमध्ये एखादा पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्याला तत्काळ पदावरून बडतर्फ करण्यात येईल. तसेच आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवार, दि. २४ मार्च रोजी विधानसभेत दिली.
(state will need artificial intelligence CCTV cameras Minister of State Home Yogesh Kadam) राज्यात कृत्रिम बुद्धीमत्ताधारित (आर्टिफिशीअल इंटेलिजन्स) ‘सीसीटिव्ही कॅमरे’ लावण्यात येणार आहेत. या सीसीटिव्ही कॅमेर्यांद्वारे ‘फेस रिडिंग’द्वारे गुन्हेगारांची ओळख होणार आहेत, तसेच कुणाकडे शस्त्र असल्यास तेही या कॅमेर्यांमध्ये स्कॅन होणार होईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी विधानसभेत दिली
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची गाथा सांगणारा छावा हा चित्रपट नुकतंच काही दिवसांपूर्वी प्रदर्शीत झाला. विकी कौशल याच्या दमदार अभिनयाने नटलेल्या छावा या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलं. छावा हा सिनेमा विख्यात कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारित आहे. १९७९ साली पहिल्यांदाच छावा कादंबरी प्रकाशित झाली. अल्पावधीतच ही कादंबरी लोकप्रिय ठरली आणि आजतागयात या कादंबरीच्या २४ आवृत्तया प्रकाशित झाल्या आहेत. छावाच्या या यशानंतर देशातील कानाकोपऱ्यातून आणि अगदी जगभरातील वाचकांकडून या कादंबरीची मागणी केली
( vidya kadam International Women day ) ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संचालक विद्या प्रशांत कदम यांचा जन्म पुण्यात झाला. आईवडील दोघेही महाराष्ट्र शासन आरोग्य विभागात असल्याने आणि कुटुंबात एकुलती लेक असल्याने त्यांचे बालपण खेळत-बागडत पर्यटनाचा आनंद लुटत गेले. बालपणी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भारतभर तसेच सात ते आठ युरोपीय देश बघण्याचे भाग्य लाभले. पुण्याच्या सेंट जोसेफ हायस्कूल, कॉन्व्हेंट शाळेतून शालेय शिक्षण, फर्ग्युसन कॉलेजमधून ‘बी.एस.सी.’ झाल्यानंतर ‘टीसीआय’मध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर या पदावर काम केले.
स्वारगेट अत्याचार घटनेबाबत मंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर सगळीकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत अशा घटनांमध्ये संवेदनशीलपणे बोलण्याचा सल्ला त्यांना दिला आहे.
(Maha Arogya Shibir) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेश रामदास कदम यांनी मुंबई येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत तपासण्यांसोबतच औषधोपचार तसेच, रुग्णांना व्हील चेअर्स, वॉकर्स, चष्मे आणि इतर वैद्यकीय सामग्रीदेखील मोफत वाटण्यात आली. विशेष म्हणजे या शिबिरात तब्बल दहा हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असून, लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद या महाआरोग्य शिबिराला लाभला आहे.
ज्यादिवशी एकनाथ शिंदे तोंड उघडतील त्यावेळी उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावे लागेल, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी केले. रत्नागिरी येथे आयोजित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेत ते बोलत होते.
दादर येथील शिवाजी पार्कमधील धुळीच्या प्रश्नाबाबत तात्काळ उपाययोजना करा, असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेला दिले.
Saif Ali Khan बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तपास सुरु असतानाच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या हल्ल्यामध्ये सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा थोरला मुलगा तैमूरचाच बळी जाणार होता, असा खळबळजनक दावा केला आहे. तैमूर नावावरुन त्याला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही आमदार आव्हाड यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळामधून आव्हाडांवर टीका होत असल्याचे पाहायला मिळाले.
महिलांवरील हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे रद्द न करता त्याचे पुनर्निरीक्षण करा, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवार, १७ जानेवारी रोजी दिल्या.
शिवाजी पार्कमधील धुळीच्या समस्येवर १५ दिवसांत आराखडा तयार करा, अशा सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिकेला दिल्या आहेत. सोमवार, ६ जानेवारी रोजी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पाहणी दौरा केला.
कसलेले कलाकार, उत्तम कथानक असलेला 'स ला ते स ला ना ते' हा 'नात्यांच्या व्याकरणाची गोष्ट' अशी टॅगलाइन असलेला हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथे चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकरांच्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीने लॉन्च करण्यात आले.
हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजतं आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. त्याशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. आता छाया कदम 'स ला ते स ला ना ते' या आगामी ७ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कान्स फिल्म फेस्टिवल गाजवणाऱ्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिग्दर्शक पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेत्री छाया कदम यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला कान्स’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रँड प्रिक्स’ हा पुरस्कार मिळाला होता.
(Ramdas Kadam) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 'न भूतो न भविष्यति' असे अभूतपूर्व यश मिळवून राज्याच्या सत्तेची सूत्रे आपल्याच हातात ठेवली आहेत. विधानसभेच्या पराभवानंतर आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत शाब्दिक वार
(Ramdas Kadam) शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सहकुटुंब शिर्डीला साईदरबारी पोहोचत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी महायुतीच्या यशाबद्दल व एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीवर भाष्य केले.
गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री छाया कदमदेखील उपस्थित होती. चित्रपटाबद्दल आणि ‘इफ्फी’च्या प्रवासाबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’ने छाया कदम आणि गजेंद्र अहिरे यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा विशेष संवाद...
(Aaditya Thackeray) शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा थेट उल्लेख करत आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे. आदित्य ठाकरेंनी गुरुवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी दापोलीतील सभेमध्ये सडकून टीका केल्यानंतर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा महायुतीचे सरकार आले तर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतील असा थेट इशारा दिला आहे.
(Vishwajeet Kadam) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सध्या राज्यात प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अशातच महाविकास आघाडीतील एका नेत्याने केलेल्या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं, पण राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं”, असे विधान माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.
घाटकोपर : घाटकोपरमध्ये गेली १५ वर्षे ‘यात्रा पॅटर्न’ आणि ‘विकास पॅटर्न’ राबवला जात आहे. त्यामुळे लोकांचा महायुतीला पाठिंबा आहे. ‘लाडकी बहीण योजने’मुळे महिला सशक्तीकरण करण्यात आले आहे. विरोधकांवर बोलण्यापेक्षा मी माझ्या विकासकामावर बोलणे जास्त पसंत करतो. घाटकोपरमधील विकास कामे पूर्ण करणे हे आमचे ध्येय आहे, असे मत घाटकोपरचे आ. राम कदम ( Ram Kadam ) यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दै.’मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला विशेष संवाद...
विरोधकांवर बोलण्यापेक्षा आपल्या विकासकामांवर बोलणारे, जनतेच्या आशीर्वादाचे पाठबळ असणारे घाटकोपर पश्चिमचे महायुतीचे उमेदवार राम कदम ( Ram Kadam )यांच्याशी साधलेला संवाद.
भाजप नेते पराग शाह यांनी मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भव्य नामांकन रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी भाजप नेते किरीट सोमय्या, राम कदम, मा. खासदार मनोज कोटक यांच्यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबईतील कलिनामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अभिनेत्री छाया कदम यांचे वडील गिरणी कामगार होते. बारावीत एकदा अनुत्तीर्ण झाल्यावरही न खचता त्यांनी ‘टेक्सटाईल डिझाईन’ची पदवी मिळवली आणि राज्यस्तरावर कबड्डीही खेळल्या. शाळा-महाविद्यालयात नाटकांमध्ये भूमिका साकारणार्या छाया यांनी पुढे अभिनयाचीच वाट निवडली. वामन केंद्रे यांच्या ‘झुलवा’ नाटकासह ‘फाट्याचं पाणी’, ‘विठ्ठल’ आणि ‘दगडांचा देव’ अशा लघुपटांमध्येही भूमिका साकारल्या. त्यानंतर चित्रपटात संधी मिळाली, पण ‘बाईमाणूस’ हा पहिला चित्रपट पडद्यापर्यंत आला नाही.
अभिनेते भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर 'सिरियल किलर' ठरला आहे. अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक येत्या शनिवारी १२ ऑक्टोबरला रंगभूमीवर दाखल होत आहे. यात भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे,तेजस पिंगुळकर या नाटकात धमाल उडवणार आहेत.
हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंनी दापोलीतून विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी दिलं आहे. तसेच पुन्हा एकदा शिंदे साहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी शुक्रवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
‘समाजाचे आपण देणे लागतो’ या भूमिकेतून जगणाऱ्या रत्नांचा ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ देऊन सन्मान करण्यासाठी अद्वैत थिएटर या नाट्यसंस्थेचे निर्माते राहुल भंडारे ह्यांनी ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. अद्वैत थिएटर संस्था १८ वर्षे रंगभूमीवर सक्रीय कार्यरत असून आजवर दर्जेदार २६ नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. अद्वैत थिएटर संस्थेकडून समाजातील प्रतिष्ठित आणि विविध क्षेत्रात प्रगती करत असताना सोबत सामाजिक बांधिलकी जपत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्याचे आयोजले
मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील विनोदवीर अभिनेते विजय कदम यांचे १० ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात शोककळा पसरली असून कलाकारांसह नेत्यांनी देखील त्यांना आदरांजली वाहिली. विजय कदम यांच्या निधनानंतर अभिनेत्री अश्विनी भावे यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. अश्विनी भावे आणि विजय कदम यांनी एकत्र हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते आमि विनोदवीर विजय कदम यांचे आज दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. गेले काही दिवस ते कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत होते. पण अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली असून त्यांनी जगाचा निरोप घेतला. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज ओशिवरा स्मशानभूमी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा गंधार असं कुटुंब आहे.
मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी ८०-९० च्या दशकात गाजवणारे विनोदवीर ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज १० ऑगस्ट रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. आज दुपारी विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी कलाविश्वातून कलाकारांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
मराठी रंगभूमीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. काही नवी नाटकं तर काही जुनी नाटकं पुर्नजिवित्त करुन त्याचे सादर केले जाणारे प्रयोग प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. अशा अनेक अजरामर नाटकांपैकी एक नाटक म्हणजे १९९० ते २००० पर्यंत दबदबा राखणारं नाटक चारचौघी. आणि ३१ वर्षांनंतर नव्या कलाकारांसह दमदार कमबॅक करणारं 'चारचौघी' हे नाटक आता पुन्हा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
अनिल देशमुखांचं डोकं फिरलं आहे, अशी टीका समीत कदम यांनी केली आहे. ईडीच्या कारवाईतून सुटका मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी समीत कदम यांच्या माध्यमातून मला निरोप पाठवल्याचे अनिल देशमुखांनी म्हटले होते. यावर आता समीत कदमांनी प्रतिक्रिया दिली.
गेल्या काही दिवसांपासून इयत्ता पहिलीच्या ‘बालभारती’च्या मराठी पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ ही कविता समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली. त्याचे कारण म्हणजे, या कवितेतील अमराठी शब्दप्रयोग, ओढूनताणून जुळवलेले यमक आणि एकूणच या कवितेचा दर्जा. यामुळे या कवितेच्या कवयित्री आणि ‘बालभारती’वरही सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. तसेच मराठी भाषा, बालसाहित्य, ‘बालभारती’ची पुस्तके, कवितानिवडीचे निकष अशा अनेक मुद्द्यांनाही या ‘व्हायरल’ कवितेने ऐरणीवर आणले. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने या कवितेविषयी शिक्षक, बालसाहि
कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्राचे आणि मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. ‘बारदोवी’ या चित्रपटाने निमित्ताने त्या निर्मात्या म्हणून समोर येणार असून या रहस्यमय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या ‘बारदोवी’ या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवणारा आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'कर्मवीरायण’ शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट, महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता उद्या म्हणजे १९ जुलै पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
लाडकी बहिण योजनेत काँग्रेसचे लोक चुकीचे फॉर्म भरून देत आहेत, अशी पोलखोल भाजप नेते राम कदम यांनी सभागृहात केली. तहसील कार्यालयात लाडली बहिण योजनेसाठीही कागदपत्र तयार करण्याचे काम सुरु असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेला लागणारी कागजपत्रे मिळण्यात अडचण येत आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राम कदमांनी ही पोलखोल केली.
कान्स चित्रपट महोत्सवात नुकताच अभिनेत्री छाया कदम यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा फडकवला. कायमच दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम यांचं नाव घेतलं जातं. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम यांच्या कारकिर्दीत नवं वळण आलं आहे. बारदोवी या आगामी चित्रपटाची सहनिर्मिती छाया कदम यांनी केली असून, त्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेतही आहेत. २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.