मुंबई : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील विनोदवीर अभिनेते विजय कदम यांचे १० ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात शोककळा पसरली असून कलाकारांसह नेत्यांनी देखील त्यांना आदरांजली वाहिली. विजय कदम यांच्या निधनानंतर अभिनेत्री अश्विनी भावे यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. अश्विनी भावे आणि विजय कदम यांनी एकत्र हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
अश्विनी भावे यांनी एक सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, "तू गेलास पण कधीच विसरला जाणार नाहीस...तुझ्या आत्म्याला शांती लाभो". अश्विनी भावे आणि विजय कदम यांनी 'हळद रुसली कुंकू हसलं' या चित्रपटात अश्विनी भावे यांनी विजय कदम यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
विजय कदम यांनी ८०-९० चं नाटकविश्व तुफान गाजवलं. टूर टूर या नाटकातून विजय कदम आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही धमाल जोडी प्रेक्षकांना मिळाली होती. ‘सही दे सही’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या.