मुंबई : मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते आमि विनोदवीर विजय कदम यांचे आज दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. गेले काही दिवस ते कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत होते. पण अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली असून त्यांनी जगाचा निरोप घेतला. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज ओशिवरा स्मशानभूमी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा गंधार असं कुटुंब आहे.
विजय कदम यांची 'विच्छा माझी पुरी करा', 'रथचक्र', व 'टूर टूर' ही नाटकं प्रचंड गाजली. त्यांनी चित्रपट क्षेत्रावरही स्वत:ची पकड मजबूत ठेवली. 'चष्मेबहाद्दर', 'पोलीसलाईन', 'हळद रुसली कुंकू हसलं'व 'आम्ही दोघ राजा राणी' या सारख्या अनेक चित्रपटांत उत्कृष्ट भूमिका साकारत त्यांच्या अभियनाची छाप उमटवली.