देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालानुसार, २०२४ मध्ये महाराष्ट्राचे सागरी मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी डिसेंबर २०२४ मध्ये मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केलेल्या काही महत्त्वाच्या आणि क्रांतिकारी बदलांचा हा परिणाम असल्याचे दिसून येत आहे.
Read More
हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही. आतंकवादाचा आणि जिहादचा रंग हिरवाच आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, ३१ जुलै रोजी दिली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाने पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी १० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे सुपूर्द केला.
इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशन मधील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या शिष्टमंडळाने राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात भेट घेऊन पावसाळी मासेमारी बंदी कालावधी गुजरात राज्याच्या धर्तीवर १५ ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी केली.
हिंदी विषयाचा खरा शकुनीमामा कोण ते समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे, असा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला आहे. राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. शनिवार, १९ जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा. त्याठिकाणी आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही, असा पलटवार मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला आहे. राज ठाकरेंनी हिंदी सक्तीबाबत केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या रेडिओ क्लब जेट्टीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, १५ जुलै रोजी याबद्दलची माहिती दिली.
केंद्र सरकारने 'महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा'च्या पुनर्रचनेची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
आधी त्या शेखच्या कानाखाली वाजवा आणि मग आपण हिंदी सक्तीबद्दल चर्चा करू, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी मनसेवर केली आहे. मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असून त्याने एका महिलेला शिवीगाळ केल्याची घटना घडली.
महाराष्ट्रातील कोळीवाड्यांमधील मच्छीमारांच्या मुलांसाठी आता सागरी खेळांच्या प्रशिक्षणाची एक अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. 'यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' आणि राज्य सरकारच्या 'मत्स्यव्यवसाय व बंदर विभागा'च्या संयुक्त विद्यमाने, सर्फिंग, सेलिंग आणि स्टँड-अप पॅडल बोर्डिंगसारख्या खेळांचे प्रशिक्षण अत्यंत माफक दरात दिले जाणार आहे.
एवढे प्रेम उतू येत आहे तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देतील का? असा खोचक सवाल खासदार नारायण राणे यांनी बुधवार, २ जुलै रोजी केला. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या यूतीबाबत भाष्य केले.
राज ठाकरेंनी शिवसेनेत यावे, असे उद्धव ठाकरे कधीच म्हणू शकत नाही. कारण राज ठाकरे शिवसेनेत आल्यास तेच प्रमुख राहतील, असे विधान खासदार नारायण राणे यांनी बुधवार, २ जुलै रोजी केले. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या यूतीबाबत भाष्य केले.
उद्धव ठाकरे यांनीच राज ठाकरेंना पक्षाबाहेर जाण्यास प्रवृत्त केले. शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरेच पूर्ण जबाबदार आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना नारायण राणे यांनी मंगळवार, १ जुलै रोजी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे याचे मराठीचे प्रेम बेगडी आहे. मराठीबद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? असा सवाल खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. राज्य सरकारने हिंदी सक्तीसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंकडून विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यावरून नारायण राणेंनी त्यांचे कान टोचले.
सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत भाऊचा धक्का येथे नवीन गस्ती नौका तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मंगळवार, १७ जून रोजी मंत्री नितेश राणे यांनी या गस्ती नौकेची पाहणी केली. तसेच सागरी सुरक्षेला शासनाचे नेहमीच प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सागरी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय असून, त्यास राज्य शासनाचे नेहमीच प्राधान्य आहे. सागरी सुरक्षा आणखी भक्कम करण्याच्या दिशेने आम्ही आणखी एक पाऊल टाकले असून, सागरी सुरक्षेसाठी नवीन गस्ती नौका तैनात करण्यात आल्या असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सागरी सुरक्षेचा 'ऑन फिल्ड' आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते
दि. 15 डिसेंबर 2024 रोजी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास ही तुलनेने कमी चर्चिली जाणारी, पण प्रचंड संधी असलेल्या खात्यांची जबाबदारी नितेश राणे यांच्याकडे आली. बेधडक शैली, कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा आणि आक्रमक नेतृत्वासाठी ओळखल्या जाणार्या नितेश राणे यांनी या खात्यांना केवळ गतिमान केले नाही, तर महाराष्ट्रासह कोकणच्या विकासाचा एक नवा अजेंडा देशासमोर ठेवला. त्यांच्या प्रत्येक निर्णयातून दिसते ती दूरदृष्टी, कृतिशीलता आणि सामान्य माणसाच्या हिताची कळकळ. नितेश राणे यांनी मत्स्यव
मच्छीमार महामंडळाचे कामकाजही तातडीने सुरु होणार
“महाराष्ट्रातील सोसायटीत जबरदस्तीने बकरा कापण्यात आला, तर हिंदुत्ववादी सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. हे कुणाच्या अब्बाचे पाकिस्तान नाही, हे आमचे हिंदू राष्ट्र आहे. येथे शरिया कायदा चालणार नाही”, असा हल्लाबोल मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २ जून रोजी केला.
२०१७ च्या एका प्रकरणात मंत्री नितेश राणे आणि इतर ३० जणांची सिंधुदुर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी अधिकाऱ्यावर मासे फेकल्याचा तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव असून यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, २ जून रोजी दिल्या.
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंच्या विभागाला सूचना
महाराष्ट्रातील बंदरे विभागाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मान्यता दिल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, दि. २९ मे रोजी दिली. नवी दिल्ली येथे पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
भाऊचा धक्का हे काही कराचीमधलं बंदर नाही तर हे आमच्या हिंदू राष्ट्रात असलेले बंदर आहे. त्यामुळे इथे हिरव्या सापांची वळवळ सहन करणार नाही, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. बुधवार, २८ मे रोजी त्यांनी भाऊचा धक्का येथे भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे आता तुम्ही आवळत चालले आहात. मुंबई महापालिकेच्या आधी तुमची सगळी भांडी फोडणार आहे, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. मंगळवार, २७ मे रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
New housing policy to fulfill the housing dream of the common man sitaram rane महाराष्ट्र सरकारने नुकतीच राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली. महिला, विद्यार्थी, नोकरदारवर्ग आणि परवडणार्या गृहनिर्मितीला चालना देणार्या या नव्या गृहनिर्माण धोरणाविषयी ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष सीताराम राणे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला केलेली ही खास बातचीत...
संजय राऊतांनी अर्धवट पुस्तक लिहिले असावे. पूर्ण पुस्तक काढले तर उद्धव ठाकरेच राऊतांना नरकात पोहोचवण्याचे काम करतील, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. राऊतांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकावरून त्यांनी निशाणा साधला.
( Minister Nitesh Rane on Maharashtra Maritime Board fund ) महाराष्ट्र सागरी मंडळाने त्या प्राप्त होणारा शंभर टक्के निधी खर्चंकरवा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. महाराष्ट्र सागरी मंडळ येथे मंगळवार दि.१३ रोजी मंडळाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. मुक्त विद्यापीठात कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतो, असे विधान संजय राऊतांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांच्यावर स्तुसीसुमनेही उधळली. बुधवारस १४ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘एआय’ प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा ठरला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. गुरुवार, १ मे रोजी सिंधुदुर्गातील शरद कृषी भवनात नितेश राणे यांच्या हस्ते ‘एआय’ प्रणालीचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण पार पडले. यावेळी ते बोलत होते.
Nitesh Rane
राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. मंगळवार, दि. २९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आले. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २०४७ पर्यंत १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ३ लाख ३० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचेही मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत
ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावे. हिंदू नावे वापरून कुणी पाकिस्तानी भारतात राहिला, तर त्याच्या तंगड्या तोडून पाकिस्तानात पाठवू. पाकिस्तानप्रेमींना भारतात रहाण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र आणि देशात पाकिस्तानप्रेमींसाठी एक इंचही जागा नाही, अशी चेतावणी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिली.
दहशतवाद्यांना मदत करणारे हात भारतातमध्ये आहेत. तेच भारत क्रिकेट हरल्यावर किंवा पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यावर फटाके वाजवत असतात. मात्र, आता हे पाकिस्तानप्रेम चालणार नाही. पहलगाममध्ये भारतीयांना हिंदू असल्याने ठार मारले. दहशतवादी आपल्या दारात आहेत, तेव्हा घरात घुसतील, याचा नेम नाही. त्यामुळे एकसंघ राहा. पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणार्यांना थारा देऊ नका,” असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी सांगितले.
“सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे,” असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.
सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे राज्याचे नुकसान केले. पुढच्या वेळी ठाकरेंचे पाच आमदारही नसतील, असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. गुरुवार, १७ एप्रिल रोजी त्यांनी बेस्ट भवन येथे बेस्टच्या विविध प्रश्नांसंदर्भात समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सिंधुदुर्ग येथे प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे सध्या खळबळ उडाली असून यात उबाठा गटाचे नेते वैभव नाईक यांचा हात असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी शुक्रवार, १८ एप्रिल रोजी केला.
सिद्धीविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर या युवकाची हत्या घडली तेव्हा आरोपी सिद्धेश शिरसाट उबाठा गटातच होता. वैभव नाईक यांच्याबरोबर आरोपीचे कितीतरी फोटो आहेत, असा पलटवार आमदार निलेश राणे यांनी मंगळवार, १५ एप्रिल रोजी केला.
Narayan Rane सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवाईमार्गे देशातील वेगवेगळ्या ठिकाणांना जोडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिपी विमानतळावरुन आता इंडिगोची विमानसेवा सुरू केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थिती चिपी विमानतळ बंद होणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी दिली.
मुंबईतील गिरणगाव म्हणजे संस्कृतीचे संचित घेऊन जगणारी नगरी. या नगरीचा उगम, त्यातील कामोगारांची चळवळ, इथल्या निरनिराळ्या माणसांच्या गोष्टी हे सारे वैभव अशोक राणे यांनी आपल्या ‘आणखी एक मोहेंजोदारो’ या माहितीपटात रेखाटले आहे. नुकतेच ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलना’त या माहितीपटाचे प्रदर्शन पार पडले. त्यानिमित्ताने या माहितीपटाचा घेतलेला आढावा.
आजचा उबाठा गट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायाशी लोटांगण घालणारी आणि वक्फ बोर्डाचं समर्थन करणारी हिरवीसेना झाली आहे, असा घणाघात मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरेंचा आणि अभ्यासाचा संबंध नाही. ते 'ढ' विद्यार्थी आहेत, असा खोचक टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
( Fishing will be given the status like agriculture Minister Nitesh Rane ) मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २४ मार्च रोजी विधानपरिषदेत दिली.
राज्यभरात सध्या दिशा सालीयान मृत्यू प्रकरणाची चर्चा असून शनिवार, २२ मार्च रोजी खा. नारायण राणे यांनी याप्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत मनोरुग्ण झाले आहेत. त्यांना मेडिकल चेकअप करावे लागेल, असा घणाघात खासदार नारायण राणे यांनी केला आहे. शनिवार, २२ मार्च रोजी भाजप कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वा! चित्राताई वाघ वा! अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी आमदार चित्रा वाघ यांचे तोंडभरून कौतूक केले. गुरुवार, २० मार्च रोजी अनिल परब यांनी चित्रा वाघ यांच्यावर टिका केली. त्यावर चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले. याबद्दल नारायण राणे यांनी ट्विट करत त्यांचे कौतूक केले.
स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार
गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ४९ बोटींना परवानगी देण्यात आली आहे.