...त्यापेक्षा मदरसे बंद करा! मंत्री नितेश राणेंचा राज ठाकरेंवर पलटवार
19-Jul-2025
Total Views | 21
मुंबई : शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा. त्याठिकाणी आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही, असा पलटवार मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला आहे. राज ठाकरेंनी हिंदी सक्तीबाबत केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
शुक्रवारी मीरा-भाईंदर येथील सभेत बोलताना तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानेच नाही तर शाळाही बंद करू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. यावर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा. त्याठिकाणी आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही. बुलढाण्याच्या मदरशात येमेनचे नागरिक लपले होते. असंख्य मदरशांमध्ये जिलेटीनच्या कांड्या, तलवारी सापडतात. हिंदू समाजात भांडण लावण्यापेक्षा आणि आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करुन टाका. ते आतंकवाद्यांचे अड्डेच आहेत तिथे शिक्षण कुठे आहे?" असा सवाल त्यांनी केला.
"संजय राजाराम राऊतांचे वय झाले आहे. आशिष शेलारांनी विधान परिषदेत भाषण केले आहे. त्यांत्याकडे टेपरेकॉर्डर पाठवतो. निशिकांत दुबेंना भाजपने पहिला विरोध केला. निशिकांत दुबे जे बोलले ते आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका आम्ही मांडली. पण हिंदू म्हणून आम्ही आपसात का भांडावे? नया नगर, भेंडी बाजारमध्ये शीर कुर्मा, बिर्याणीची पार्टी व्हावी म्हणून आम्ही भांडावे का?" असेही ते म्हणाले.
ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेबांचा!
"लोकसभेला यांचे खासदार निवडून आले तेव्हा निवडणूक आयोग वाईट नाही वाटला का? ठाकरे नावाचा ब्रँड हा फक्त बाळासाहेब ठाकरेंचा होता. तो हिंदूत्वाच्या नावाने ब्रँड होता. तो हिंदूत्वाचा धागा या लोकांनी सोडला आणि ते जिहाद्यांच्या, हिरव्या सापांच्या प्रेमात पडले," अशी टीकाही मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.