हिंदी विषयाचा खरा शकुनीमामा कोण ते समजून घ्या! मंत्री नितेश राणेंचा राज ठाकरेंना सल्ला
19-Jul-2025
Total Views |
मुंबई : हिंदी विषयाचा खरा शकुनीमामा कोण ते समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे, असा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला आहे. राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. शनिवार, १९ जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "ज्याच्यासोबत तुम्ही मराठीची सभा घेतली तो हिंदी विषयाचा शकुनीमामा आहे. त्यांनी हिंदी सक्तीचा विषय सुरु केला. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते जीआर रद्द केले ते कसे विलन होऊ शकतात? ज्यांनी हा प्रस्ताव आणला त्या उद्धव ठाकरेंना आपण जबाबदार का धरत नाही? राज ठाकरेंनी त्यांच्यासोबत सभा घेता कामा नये. लोकसभेचे उमेदवार निवडून आले तेव्हा पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले? उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत अल्लाहू अकबर, सर तन से जुदा हे नारे कसे दिले? हिरवे झेंडे कसे फडवकले? खरा विलन कोण हे आधी ओळखा. मराठी सक्ती आमच्या राज्यात आहेत. आम्ही मराठी नाही का? आम्ही पाकिस्तातून आलोय का? पण खऱ्या विलनला आपण प्रश्न विचारत नाहीत. त्याच्यासोबत हात वर करून सभा घेता. आजच्या सामनामध्ये राज ठाकरेंच्या सभेची बातमी का नाही? बंधू प्रेम आहे तर मीरा रोडच्या सभेची बातमी का नाही? त्यामुळे खरा शकुनी मामा कोण ते समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे. हिंदी सक्तीसाठी कुणाला जबाबदार धरायचे असल्यास त्यालाच जबाबदार धरा. हिंदी सक्तीच्या नावाने उद्धव ठाकरे उर्दू सक्तीचा मार्ग मोकळा करत होते," असे ते म्हणाले.
"निशिकांत दुबेंचे कुणीही समर्थन करत नाही. पण मीरा रोडची सभा तुम्ही नया नगरमध्ये घ्यायला हवी होती. तिथे चुकूनही कोणी मराठी बोलत नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानही मानत नाहीत. कोरोना काळात आपण सगळे मास्क लावायचो, वॅक्सीन घ्यायचो. त्यावेळी नया नगरमध्ये शरिया कायदा लागू होता. नया नगरमध्ये मराठी नाही बोलणार अशी डायरेक्ट धमकी देतात. त्यामुळे गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा जे खुलेआम धमक्या देतात त्यांना मराठी शिकवा," असे म्हणत नितेश राणेंनी यावेळी एक व्हिडीओसुद्धा दाखवला.
ते पुढे म्हणाले की, "यांच्या थोबाडातून मराठी कधी निघणार? यांना आमच्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचे आहे. हिंदू समाज संपवायचा आहे. पण त्यांना कोणी बोलत नाही. नया नगरमध्ये कोणाला मराठी बोलायला लावत नाही. मात्र, उगाच गरीब हिंदुंना मारतात.
हिंदी विषयाचा खरा शकुनीमामा कोण ते समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे, असा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला आहे. राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. शनिवार, १९ जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "ज्याच्यासोबत तुम्ही मराठीची सभा घेतली तो हिंदी विषयाचा शकुनीमामा आहे. त्यांनी हिंदी सक्तीचा विषय सुरु केला. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते जीआर रद्द केले ते कसे विलन होऊ शकतात? ज्यांनी हा प्रस्ताव आणला त्या उद्धव ठाकरेंना आपण जबाबदार का धरत नाही? राज ठाकरेंनी त्यांच्यासोबत सभा घेता कामा नये. लोकसभेचे उमेदवार निवडून आले तेव्हा पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले? उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत अल्लाहू अकबर, सर तन से जुदा हे नारे कसे दिले? हिरवे झेंडे कसे फडवकले? खरा विलन कोण हे आधी ओळखा. मराठी सक्ती आमच्या राज्यात आहेत. आम्ही मराठी नाही का? आम्ही पाकिस्तातून आलोय का? पण खऱ्या विलनला आपण प्रश्न विचारत नाहीत. त्याच्यासोबत हात वर करून सभा घेता. आजच्या सामनामध्ये राज ठाकरेंच्या सभेची बातमी का नाही? बंधू प्रेम आहे तर मीरा रोडच्या सभेची बातमी का नाही? त्यामुळे खरा शकुनी मामा कोण ते समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे. हिंदी सक्तीसाठी कुणाला जबाबदार धरायचे असल्यास त्यालाच जबाबदार धरा. हिंदी सक्तीच्या नावाने उद्धव ठाकरे उर्दू सक्तीचा मार्ग मोकळा करत होते," असे ते म्हणाले.
नया नगरमध्ये भा घ्या!
"निशिकांत दुबेंचे कुणीही समर्थन करत नाही. पण मीरा रोडची सभा तुम्ही नया नगरमध्ये घ्यायला हवी होती. तिथे चुकूनही कोणी मराठी बोलत नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानही मानत नाहीत. कोरोना काळात आपण सगळे मास्क लावायचो, वॅक्सीन घ्यायचो. त्यावेळी नया नगरमध्ये शरिया कायदा लागू होता. नया नगरमध्ये मराठी नाही बोलणार अशी डायरेक्ट धमकी देतात. त्यामुळे गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा जे खुलेआम धमक्या देतात त्यांना मराठी शिकवा," असे म्हणत नितेश राणेंनी यावेळी एक व्हिडीओसुद्धा दाखवला.
ते पुढे म्हणाले की, "यांच्या थोबाडातून मराठी कधी निघणार? यांना आमच्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचे आहे. हिंदू समाज संपवायचा आहे. पण त्यांना कोणी बोलत नाही. नया नगरमध्ये कोणाला मराठी बोलायला लावत नाही. मात्र, उगाच गरीब हिंदुंना मारतात."