
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी १० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे सुपूर्द केला. फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ, बॅनर किंवा होर्डिंग लावण्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री नितेश राणे यांनी ही मदत कक्षाकडे जमा केली.