मुंबई : संजय राऊतांनी अर्धवट पुस्तक लिहिले असावे. पूर्ण पुस्तक काढले तर उद्धव ठाकरेच राऊतांना नरकात पोहोचवण्याचे काम करतील, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. राऊतांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकावरून त्यांनी निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊत तुरुंगात असताना किंवा त्यांच्यावर केस सुरु असताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिल्यात त्याचा उल्लेख ते पुस्तकात करायचे विसरले. तुरुंगात असताना ते दुसऱ्यांसमोर सातत्याने उद्धव ठाकरेंची लायकी काढायचे. हिंमत असेल तर याचा पुस्तकात उल्लेख करावा. नुसतं बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर प्रेम कशाला दाखवता?" अशा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला शिव्या, याला पोहोचवून दाखवतो एवढ्यापर्यंत राऊतांची मजल गेली होती. ते सगळं पुस्तकात का लिहिलं नाही? अर्धे अपुरे पुस्तक लिहू नये. पूर्ण पुस्तक काढा मग उद्धव ठाकरेच संजय राऊतांना नरकात पोहोचवण्याचे काम करतील," असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.