'नरकातील स्वर्ग', पुस्तकावर अशी फडणवीसांची अशी प्रतिक्रीया राऊतांची बोलतीच बंद!

बाल वाङमय वाचण्याचं माझं वय नाही! मुख्यमंत्री फडणवीसांचा राऊतांना टोला

    16-May-2025
Total Views |

Devendra Fadanvis 
 
बुलढाणा : बाल वाङमय वाचण्याचं माझं वय नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या पुस्तकावर लगावला आहे. शुक्रवार, १६ मे रोजी त्यांनी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
संजय राऊतांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकावर सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "कथा कादंबऱ्या आणि बाल वाङमय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे अशा गोष्टी मी वाचत नाही," असा टोला त्यांनी लगावला.
 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूतीतच!
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूती महायूतीमध्येच लढेल. अपवादात्मक स्थितीत आम्ही वेगवेगळे लढलो तरी सामंजस्याने लढू. एखादी महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेत वेगळं लढावं तरी सामंजस्य असेल. पण एकंदरीत आमची महायूतीच असेल," असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.