देशभरातील विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या उद्देशाने स्वदेशी जागरण मंचने १० ऑगस्ट रोजी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले असून 'विदेशी कंपनियों भारत छोड़ो' कार्यक्रमात सहभागी होण्याचेही आवाहन केले आहे. ई-कॉमर्स कंपन्यांमुळे भारतातील किरकोळ व्यापाऱ्यांना आणि स्थानिक बाजारपेठांना होणाऱ्या नुकसानीपासून आणि विदेशी वस्तूंमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी जनतेच्या समर्थनासह हे कार्यक्रम होणार आहेत. याकरीता पश्चिम बंगालमधील हरिगुरु गोपाल चंद्र धाम, पंचगडा येथे दोन दिवसीय कार्यशाळा आ
Read More
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स क्षेत्रातील वृद्धीने या क्षेत्राला चालना दिली आहे. त्यामुळे सध्याच्या जागतिक व्यापारयुद्धाच्या छायेत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासनीतीचाच हा सकारात्मक परिणाम सर्वस्वी सुखावणारा असा... नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामा
हल्लीचा जमाना हा ऑनलाईन खरेदीचा. तरीही ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांचे हक्क, अधिकार यांच्याविषयीची जागरुकता अभावानेच दिसून येते. पण, ई-कॉमर्सच्या युगात ग्राहकांनी खरेदी करताना खबरदारी घेण्याबरोबरच, आपले हक्क समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे. आज ‘जागतिक ग्राहक दिना’निमित्ताने याबाबतचा घेतलेला सविस्तर आढावा...
पूर्वी ऑनलाईन वस्तू खरेदी हा चैन आणि स्टेटसचा विषय होता. कपड्यांपासून ते मोबाईलपर्यंत, प्रत्येक गोष्ट या प्लॅटफॉर्मवर एका क्लिकवर उपलब्ध होत होती. मात्र, ऑर्डर केल्यानंतर वस्तू पोहोचण्यासाठी किमान तीन ते चार दिवसांचा अवकाश असे. हा कल आता दहा मिनिटांत वस्तू घरपोच मिळविण्याच्या अॅप्समुळे बदलू लागला आहे.
बहुप्रतीक्षित रिलायन्स डिजिटलचा डील ऑफर ब्लॅक फ्रायडे सेल अखेरीस ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२४ पर्यंत स्पेशल डील ऑफर ग्राहकांना रिलायन्स डिजिटल, MyJio स्टोअर्स व रिलायन्स डिजिटलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.
यंदा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल' दरम्यान अधिक ग्राहक गैर-मेट्रो भागातील म्हणजेच महानगरातव्यतिरक्त अन्य शहरांमधील होते, असे ॲमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष सौरभ श्रीवास्तव यांनी एका व्हिडीओ मुलाखतीत सांगितले. ८५ टक्क्यांहून अधिक ग्राहक महानगराच्या बाहेरील शहरांतील असून सेल २७ सप्टेंबरपासून २४ तासांच्या प्राइम अर्ली सुविधेसह सुरू झाला, असेही श्रीवास्तव यावेळी म्हणाले.
ई-कॉमर्स क्षेत्रात भारताच्या अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणण्याची तसेच, विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकत त्यांची भरीव वाढ घडवून आणण्याची क्षमता आहे. याचाच फायदा घेऊन एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास देशातील लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना त्याचा लाभ घेता येईल आणि त्यातूनच आर्थिक विकासाला चालना मिळेल.
सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून सेल ऑफर जाहीर केली जाते. दसरा सणाच्या मुहूर्तावर ई-कॉमर्स कंपनी मीशोला 'सीझन सेल'च्या पहिल्या दिवशीच ६.५ कोटी लोकांनी भेट दिली आहे. तसेच, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील ऑर्डरदेखील दुप्पट झाल्या आहेत. ई-कॉमर्स साईटवरील ऑनलाईन खरेदीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांची मोठी ऑफर सुरू असून विक्रमी विक्रीची अपेक्षा कंपन्यांना असणार आहे. अॅमेझॉन इंडियाकडून सणासुदी काळातील रणनीती बनविण्यासाठी, कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपनीकडून फ्लॅगशिप फेस्टिव्ह सेल 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' बाजारात दाखल झाला आहे.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारकडून कस्टम ड्युटीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादननिर्मिती करणाऱ्या उद्योगक्षेत्रास होत असून उत्पादनांच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच ‘लॉजिस्टिक्स इज अॅक्रॉस डिफरंट स्टेट २०२३‘ (एलईएडीएस) अहवालाची पाचवी आवृत्ती प्रसिद्ध केली. या अहवालात देशातील २८ राज्यांतील आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधील मालवाहतुकीसाठी उपयोगात येणार्या पायाभूत सुविधा, सेवा आणि मानवी संसाधनांचे मूल्यांकन आणि भागधारकांकडून प्राथमिक माहिती गोळा करून निर्देशांकाच्या आधारे त्यांची क्रमवारी ठरवण्यात आली आहे. या अहवालाचा घेतलेला हा आढावा...
भारताच्या आयटी क्षेत्राने जगभरात आर्थिक मंदी असतानाही महसुलात वाढ नोंदवली आहे. भारतात होत असलेले वाढते ‘डिजिटलायझेशन’, ‘एआय’ तसेच ‘मशिन लर्निंग’चा वाढता वापर आणि ‘ई-कॉमर्स’ क्षेत्राची होत असलेली विक्रमी वाढ आयटी क्षेत्राच्या वाढीला हातभार लावणारी ठरली आहे. त्याविषयी...
ऐन गणशोत्सवाच्या मुहूर्तावर ई-कॉमर्स व्यवसायातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनने कॅश ऑन डिलिव्हरीवर २००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत अपडेट जारी केले आहे. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून विविध ऑफर किंवा किंमतीत सवलत दिली जाते. त्यामुळे ग्राहक वस्तू खरेदीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना पसंती देतात. त्यातच आता अॅमेझॉनकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून दि. १९ सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटांची कॅश डिलिव्हरी घेणार नाही.
देशातील ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक 'फ्लिपकार्ट'मध्ये तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टने 'बिग बिलियन्स डे' विक्री दरम्यान, १ लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, या हंगामी नोकऱ्या स्थानिक किराणा वितरण भागीदार, महिला, अपंग व्यक्ती (PWD) आणि इतरांसह लोकांना रोजगार देतील, असे फ्लिपकार्टने म्हटले आहे.
‘एमएसएमई’ क्षेत्रास निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने अनेक उपायांचा फायदा होणार आहे. नवीन व्यापार धोरणाच्या व्याप्तीमध्ये, ई-कॉमर्स निर्यातदार आता इतर निर्यातदारांना नव्या धोरणाद्वारे देण्यात आलेल्या सर्व तरतुदींचा लाभ घेता येणार आहे. याद्वारे ‘एमएसएमई’ क्षेत्रास परदेशी बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करणे सोपे होणार आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी ‘भारताचे परकीय व्यापार धोरण २०२३ ‘जारी केले. हे नवीन परकीय व्यापार धोरण आजपासून लागू होणार आहे. यामध्ये २०३० पर्यंत भारताची निर्यात दोन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
एका आभासी ‘बुक स्टोअर’च्या माध्यमातून ‘अॅमेझॉन’ची स्थापना करून जगभरात नावाजलेला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून ‘अॅमेझॉन’ची ओळख निर्माण करणारे कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस सोमवार, दि. ५ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा देणार आहेत. बेझोस यांची जागा ‘अॅमेझॉन’च्या ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’चे संचालक अॅण्डी जेसी घेणार आहेत.
कोरोना महामारीने भारतात प्रवेश केल्यांनतर भारतात टाळेबंदी लागली यामुळे जीवनावश्यक गोष्टीही लोक ऑनलाईन मागवू लागली आहेत. यामुळे ऍमेझॉन,फ्लिपकार्ट इत्यादी..अँप चे मार्केट भाव अचानक वधारले आहेत. अशात भारतीयांसाठी एक चांगली बातमी म्हणजे टाटाने बेंगळुरूतील बीग बास्केट हि कंपनी विकत घेतली आहे.
जनसामान्यांमध्ये ‘कोविड-१९’च्या संदर्भातील आजार-निदान आणि उपचार यापोटी व्याप्त असणारी प्रचंड भीती. यातूनच फार मोठ्या संख्येने लोकांनी घराबाहेर न पडताच, घरपोच वस्तू-सेवा पुरवण्याचा पर्याय निवडला व त्याला वाढता प्रतिसाद मिळत गेला व ‘ई-कॉमर्स’ व्यवसायाला अशाप्रकारे ‘अच्छे दिन’ प्राप्त झाले.
ग्राहक हक्कांबद्दल तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगाबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाही. या संदर्भात व्यापक जनजागृतीची गरज असून समाजातील सुज्ञ लोकांना ग्राहक जनजागृतीच्या कार्याशी जोडले गेले पाहिजे असे सांगून पिडीत ग्राहकांना शीघ्र गतीने न्याय मिळण्यासाठी राज्यातील ग्राहक न्यायालयांचे बळकटीकरण केले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
मुळातच खुनशी विचारसरणीच्या कम्युनिस्ट सरकारने जॅक मा यांनाच गायब केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा काहीही पत्ता नाही. ते जीवंत आहे की त्यांना ठार मारले, याचीही काहीच कल्पना नाही. अर्थात, आपल्याविरोधात बोलणाऱ्याचा आवाज कायमचा बंद करणे म्हणजेच त्याला ठार मारणे, ही जगभरातील कम्युनिस्टांची सवय आहे.
कुठल्याही देशात व्यापार करायचा म्हटला की, तिथली संस्कृती, भाषा आणि परंपरांचा आदर करणे हे आपसूकच आले. मग त्यासाठी अत्यंत आकर्षक जाहिराती, कॅम्पेनद्वारे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये ‘अॅमेझॉन’ या बहुराष्ट्रीय कंपनीचा जो मनमानी कारभार सुरू आहे, त्याला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे, यापलीकडे काहीही म्हणू शकत नाही.
आशियातील सर्वात श्रीमंत बँकर अशी ओळख असणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि सीईओ उदय कोटक यांनी परकीय गुंतवणूकदारांना साद घातली आहे. भारतात गुंतवणूक करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय डिजिटल कंज्युमर सेगमेंटच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला हवी. कोरोना महामारीमुळे हेच क्षेत्र सर्वात जास्त शक्तीशाली बनत चालले आहे, असे ते म्हणाले.
‘डिजिटल इंडिया’च्या रुपात भुसभुशीत जमिनीवर या कंपन्यांची पाळेमुळे भविष्यात खोलवर रुजू लागतील. ‘रिलायन्स जिओ’मध्ये फेसबुकतर्फे केली जाणारी ५.७ दशलक्ष डॉलर (४३ ,५७४कोटी) इतकी मोठी गुंतवणूक हे त्याचेच एक यश म्हणावे लागेल.
भारतात वस्तूंची कमी झालेली मागणी आणि त्याच वेळी शेअर बाजाराची आगेकूच हे परस्परविरोधी वाटत असले, तरी त्याचा आणि नव्या आर्थिक बदलांचा जवळचा संबंध आहे. काही मोठ्या कंपन्या याच काळात अतिशय चांगला महसूल मिळवित आहेत, तर छोट्या कंपन्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे?
वाहन उद्योगावर सध्या आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असल्याचे चित्र दिसत असले तरीही अॅमेझोन ही बहुराष्ट्रीय कंपनी भारतात आपली पाळेमुळे घट्ट रोवण्याची तयारी करत आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठा सेल आणि कामगारांचा संप या दोन्ही घटना एकाचवेळी घडत असताना अॅमेझॉनने आणि अलीबाबा, फ्लिपकार्ट, मिंत्रासारख्या प्लॅटफॉर्मनी अर्थव्यवस्थेसाठी, ग्राहकांसाठी नेमके काय केले? ग्राहकांचा फायदा झाला का? ई-कॉमर्समुळे पारंपरिक बाजारपेठेपुढे-अर्थव्यवस्थेपुढे कोणते प्रश्न निर्माण झाले आणि त्याचे बरेवाईट परिणाम काय? सकल राष्ट्रीय उत्पन्नात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा आणि तिथल्या रोजगाराचा सहभाग नेमका किती? असे प्रश्न उपस्थित होतात.
ई-कॉमर्स वॉलमार्ट, युएस सिक्युरीटीज्, एक्सचेंज कमीशन आणि अमेरिकेच्या न्याय विभागातर्फे एकूण १९६४ कोटींचा दंड आकारला जाणार आहे.
‘अॅमेझॉन’चे अस्तित्त्व जगातील अनेक देशांत असले तरी भारतात तिने जोर लावला आहे.
डिजिटल चळवळ पुढे घेऊन जाण्यात आपले हित आहे, हेही भारतीय समाजाने ओळखले आहे
या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड इकनॉमिक फोरमने 5G तंत्रज्ञानावर चिंतन केले आहे, त्यातून पुढे आलेल्या बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख.