नवी दिल्ली : कोरोना महामारीने भारतात प्रवेश केल्यांनतर भारतात टाळेबंदी लागली यामुळे जीवनावश्यक गोष्टीही लोक ऑनलाईन मागवू लागली आहेत. यामुळे ऍमेझॉन,फ्लिपकार्ट इत्यादी..अँप चे मार्केट भाव अचानक वधारले आहेत. अशात भारतीयांसाठी एक चांगली बातमी म्हणजे टाटाने बेंगळुरूतील बीग बास्केट हि कंपनी विकत घेतली आहे.
टाटा मधील टाटा सनने या कंपनीला विकत घेतले आहे तरी अद्यापया डीलविषयी बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.यात त्यांनी सांगितले कि सध्यातरी आम्ही बिग बास्केटला स्वातंत्र्य कंपनी म्हणून चालवून देणार आहे.मार्च महिन्यात ६४.३ टकके 'शेअर्स टाटा डिजिटल' अंतर्गत टाटाने विकत घेतले होते. समाजमाध्यमानुसार ही डील ९५ बिलियन डॉलर मध्ये झाली आहे .
या डीलमुळे नक्कीच विदेशी' इ - कॉमर्स 'कंपनीना टक्कर देण्यासाठी भारतीय कंपनी उभी राहिल.' बिग बास्केट' हि कंपनी बंगळुरु स्थित असून देशभरात जीवनावश्यक गोष्टींचा ती पुरवठा करायची. आता हि कंपनी टाटाने विकत घेतल्यामुळे नक्की यांच्या सुविधेत कोणते बदल केले जातील,हे पाहण्याजोगे असेल