'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'ला लहान शहरांचा मोठा प्रतिसाद; १.४ अब्ज ग्राहकांची खरेदी!
04-Nov-2024
Total Views |
मुंबई : यंदा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल' दरम्यान अधिक ग्राहक गैर-मेट्रो भागातील म्हणजेच महानगरातव्यतिरक्त अन्य शहरांमधील होते, असे ॲमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष सौरभ श्रीवास्तव यांनी एका व्हिडीओ मुलाखतीत सांगितले. ८५ टक्क्यांहून अधिक ग्राहक महानगराच्या बाहेरील शहरांतील असून सेल २७ सप्टेंबरपासून २४ तासांच्या प्राइम अर्ली सुविधेसह सुरू झाला, असेही श्रीवास्तव यावेळी म्हणाले.
दरम्यान, मध्यम आणि लहान शहरांमध्ये आणि ‘भारतात’ तुम्हाला कोणत्या प्रकारचे ट्रेंड दिसत आहेत?, असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला. ते म्हणाले, ८५ टक्क्यांहून अधिक ग्राहक हे बिगर मेट्रो शहरे आणि मध्यम आणि लघु क्षेत्रातील होते. या ठिकाणांहून ५० टक्क्यांपेक्षा अधिक टीव्ही खरेदी करण्यात आली असून प्रीमियम स्मार्टफोनच्या विक्रीत मध्यम आणि इतर शहरांचा वाटा ७० टक्क्यांहून अधिक आहे.
ते पुढे म्हणाले, मध्यम आकाराची शहरे आणि लहान शहरांमधील ६० टक्क्यांहून अधिक नवीन अॅमेझॉन ग्राहकांनी फॅशन आणि सौंदर्य उत्पादने खरेदी केली. हे ट्रेंड आमच्यासाठी उत्साहवर्धक आहेत कारण ॲमेझॉन देशभरात विश्वास संपादन करत आहे याचे द्योतक आहे. यंदा सणासुदीच्या विक्रीत तुम्हाला कोणत्या प्रकारची वाढ दिसली, गेल्या वर्षांपेक्षा कशी वेगळी होती? यावर बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी आम्ही ३०-३५ दिवसांत ग्राहक संख्या गाठली होती, यावेळी आम्ही ती २० दिवसांत गाठली. जवळपास १.४ अब्ज ग्राहकांनी आमच्या साइटला भेट दिली.