अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीकडे भारताचे लक्ष; कोण मारणार बाजी!

निवडणुकीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम?, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

    04-Nov-2024
Total Views |

the-impact-of-us-elections-will-also-be-visible


मुंबई :       येत्या ०५ नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्या समोर रिपब्लिकन पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आव्हान असणार आहे. या निवडणुकीकडे सबंध जगाचे लक्ष लागले असून याचा निवडणूक निकालाचा परिणाम जगातील प्रमुख राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. यासंदर्भात तज्ज्ञांच्या मतांनुसार भारतीय अर्थव्यवस्थेवर नकळत परिणाम होईल.




दि. ०५ नोव्हेंबरला होणाऱ्या अक्ष्यक्षीय निवडणुकीचे निकाल भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनेक समस्या निर्माण करू शकतात असे सांगताना वाढीव संरक्षण उपायांपासून देशांतर्गत वाढ आणि रोजगारावर होणारा परिणाम यापर्यंतचा समावेश आहे, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अमेरिकन निवडणुकीत निकाल कुणाच्या बाजूने लागते यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे. दरम्यान, अमेरिकेच्या चीनविरोधी भूमिकेचा भारताला फायदा होण्याची शक्यता असून निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी भारताच्या निर्यातीला चालना मिळू शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
 
एकंदरीत, भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण उत्पादन व्यापार संबंधांना लक्षात घेतल्यास आगामी अमेरिकन सत्ताधाऱ्यांनी उत्पादन क्षेत्राला कठोर धोरणांचा अवलंब केल्यास द्विपक्षीय संबंधांत अडथळे येऊ शकतात. किंबहुना, भारताचे देशांतर्गत मूलतत्त्व स्थिर असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे काही चिंता वाढू शकतात, असेही अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. उच्च तुटीला दिलेले प्राधान्य महागाईला गती देईल आणि रोख्यांच्या उत्पन्नावर परिणाम करेल. तर डॉलरची ताकद राखणे हा देखील एक मुद्दा आहे ज्यामुळे रुपयावर दबाव वाढू शकतो, असे बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले.