भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ : उदय कोटक

    20-Oct-2020
Total Views | 132
Uday Kotak_1  H




मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत बँकर अशी ओळख असणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि सीईओ उदय कोटक यांनी परकीय गुंतवणूकदारांना साद घातली आहे. भारतात गुंतवणूक करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय डिजिटल कंज्युमर सेगमेंटच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला हवी. कोरोना महामारीमुळे हेच क्षेत्र सर्वात जास्त शक्तीशाली बनत चालले आहे, असे ते म्हणाले.


 
आत्ताच्या घडीला भारतात गुंतवणूक करणे योग्य निर्णय ठरेल

उदय कोटक यांनी ‘ब्लूमबर्ग इंडिया इकोनॉमिक समिट’मध्ये दिलेल्या मुलाखतीत आपले मत व्यक्त केले आहे. माझे मत असे आहे की ज्यावेळी आव्हानात्मक स्थिती असेल तिच वेळ गुंतवणूकीसाठी योग्य ठरते. भारतात पैसा गुंतवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. सध्या देशातील अर्धी लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत आहे. इंटरनेट ग्राहक वाढत आहेत. ई-कॉमर्स कंपन्या डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत. परकीय गुंतवणूक ई-कॉमर्स कंपन्यांनी भारतात येण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे.
 
 
 
तिथेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी यावर्षी २० अब्ज डॉलर्स इतकी कमाई केली आहे. आपल्या टेलिकॉम तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ३३ टक्के हिस्सेदारी विकत फेसबूक, गुगल आणि अन्य कंपन्यांना विकली आहे. त्यांची रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ही कंपनी दोन महिन्यांमध्ये खासगी इक्विटीद्वारे आणइ सॉवरेन वेल्थ फंडाद्वारे ५.१ दशलक्ष डॉलर्स इतकी गुंतवणूक जमा केली आहे.
 
 
या क्षेत्रात करू शकता गुंतवणूक
 
उदय कोटक म्हणाले, “भारतात गुंतवणूक करण्यासाठी डिजिटल कंपन्या, ई-कॉमर्स, तंत्रज्ञान कंपन्या, फार्मा आणि कंज्यूमर सेगमेंट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे.” आरोग्य क्षेत्रात सुरुवातीपासूनच गुंतवणूक वृद्धी दिसून येत आहे. केकेआर अँण्ड कंपनीतर्फ जुलैमध्ये जे.बी.केमिकल्स अँण्ड फार्मा लिमिटेड कंपनीतील हिस्सेदारी खरेदी करणार आहे. कार्लाइल समुह भारतीय अब्जाधीश असलेल्या अजय पीरामल यांच्या फार्मा व्यवसायात २० टक्के गुंतवणूक केली आहे.
रूबेनस्टील म्हणाले पुढील दहा वर्षे अमेरिकेच्या बाहेर गुंतवणूक करण्यासाठी भारत आणि चीन हे दोन उत्तम पर्याय आहेत. भारताकडे चीनच्या तुलनेत तितकीशी संसाधने नाहीत. मात्र, पुढील दहा वर्षांमध्ये भारतातील परिस्थितीही बदलेल. परदेशातील गुंतवणूकदार भारताकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहतील.

 
बाजारातील हिस्सेदारी वाढणार
 
उदय कोटक म्हणाले, भारतात बँकांची बाजारपेठेतील हिस्सेदारी येत्या काळात ५० टक्के होणार आहे. सध्या ती ३५ टक्के आहे. गतवर्षी खासगी बँकांच्या शेअरमध्ये २० टक्के घसरण नोंदवण्यात आली होती. सरकारी बँकांच्या शेअरमध्ये ४१ टक्के घसरण झाली होती. खासगी बँकांच्या कर्जांमध्ये ११.३ टक्के मार्चच्या तुलनेत वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्य नियंत्रित बँकांच्या तुलनेत ही तिप्पट वाढ आहे. बुडीत कर्जांचे प्रमाण ४.२ टक्के नोंदवण्यात आले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121