विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून टपोरीगिरी करण्यापेक्षा मराठीच्या मुद्द्यावर काहितरी ठोस पाऊले उचलावीत, असा सल्ला आमदार मनिषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
Read More
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे.
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंनी कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते आमदार आहे ही गोष्ट लपवली आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. गुरुवार, ३ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणताही घातपात झालेला नाही, असे प्रतिज्ञापत्र एसआयटीने उच्च न्यायालयात दाखल केले आहे.
दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असून या प्रकरणात कोणताही लैंगिक अत्याचार किंवा हत्या झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत त्यांच्या मुलीच्या मृत्यूला गूढ व अमानवी स्वरूप असल्याचे नमूद करत, सीबीआय आणि उबाठाचे वरळीतील आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
एकत्र येण्याबाबत राजसाहेब आणि उद्धवजी बोलले तरच काहीतरी होईल. त्यामुळे आता त्यांची इच्छा असल्यास त्यांनी फोन करावा, अशी प्रतिक्रिया मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी दिली आहे. उबाठा गट आणि मनसेच्या यूतीबाबात आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर त्यांनी गुरुवार, ५ जून रोजी माध्यमांशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली.
मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी बुधवार, दि. २८ मे रोजी केला. या प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया यांची चौकशी सुरू असून, त्याची आदित्य ठाकरे यांच्याशी घनिष्ट मैत्री असल्याने आदित्य यांचीदेखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.
मेट्रो-३ ला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मेट्रोचा 'म' उच्चारण्याचा तरी अधिकार असावा का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात पाणी शिरल्याने आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. यावर चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे आता तुम्ही आवळत चालले आहात. मुंबई महापालिकेच्या आधी तुमची सगळी भांडी फोडणार आहे, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. मंगळवार, २७ मे रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून विशेषत: मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पावसाळी पर्यटन करणारे युवराज आदित्य ठाकरे यांना मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करून चांगलाच आरसा दाखवला.
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कटकमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या सुरु आहे, असा हल्लाबोल मंत्री आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंसह उबाठा गटावर केला आहे. तसेच त्यांनी मुंबकरांना सावधानतेचा इशारादेखील दिला आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे.
देवनार ‘डम्पिंग ग्राउंड’ साफ करण्यासाठी २ हजार ३६८ कोटींच्या खर्चाची निविदा मुंबई पालिकेने काढली. तेव्हापासून कचऱ्यावर राजकारण करणारी काही गिधाडे, कावळे आणि बगळे तेथे घिरट्या घालू लागले आहेत. कचऱ्यावरचे कटकमिशन खाऊन गेल्या पंचवीस वर्षांत ते गलेलठ्ठ झाले आहेत. युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन आरोप करताना, त्यांनी केलेली लूटमार सोईस्करपणे विसरत आहेत, असा हल्लाबोल मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवार, दि. १५ मे रोजी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत प्रतिपालिका सभागृह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आदित्य ठाकरेंना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबतच कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनादेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई मनपाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेता, ठाकरेंना अचानक मुंबईबद्दल पुतनामावशीच्या प्रेमाचे कोरडे उमाळे दाटून येऊ लागले. ज्या ठाकरी कारभाराने मुंबईची बजबजपुरी केली, पालिकेत लूट आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, मुंबईकरांचे जीवन असह्य केले, तेच ठाकरे आज अदानींच्या नावे मुंबईकरांची दिशाभूल करतात, हा विरोधाभास जनतेच्या नजरेतूनही सुटणारा नाही!
जर दिशा सालियानच्या आईवडीलांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे तर आदित्य ठाकरेंचीदेखील नार्कोटेस्ट व्हायला हवी. त्यानंतर दुध का दुध पानी का पानी होईल, अशी मागणी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यभरात सध्या दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत असून यात उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंचे नाव पुढे आले आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे सांगत यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
राज्यभरात सध्या दिशा सालीयान मृत्यू प्रकरणाची चर्चा असून शनिवार, २२ मार्च रोजी खा. नारायण राणे यांनी याप्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आपल्या कारकिर्दीत राज्यातील महिलांवर सर्वाधिक अत्याचार-अन्याय करण्याचे कर्तृत्व उद्धव ठाकरे सरकारने गाजविले आहे. सत्तेचा मद चढलेल्यांना आपली कुकर्मे कधीच बाहेर येणार नाहीत, असा विश्वास वाटत असतो. पण, खुनाला वाचा फुटते, यावर पोलिसांचा विश्वास असतो. आता गेली पाच वर्षे दाबून टाकण्यात आलेल्या दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता दिसत असून, त्यातून धक्कादायक सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
दिशा सालियानवर सामुहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठी वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, २० मार्च रोजी केली. त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
उबाठा गटाचे युवराज आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बुधवार, दि. 5 मार्च रोजी विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. “गुलाबरावांना मंत्री म्हणून अभ्यास करून यायला सांगा,” अशी मागणी आदित्य यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान. त्यांच्या इच्छा, आकांक्षा, कृती आणि तत्त्वज्ञान जनतेकडून अतिशय आदराने स्वीकारले गेले. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला स्मारकाच्या रुपात अजरामर करण्याच्या जन इच्छेचा मान ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 27 डिसेंबर 2016 रोजी बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी दिली. त्यासाठी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त संस्थेची स्थापनाही करण्यात आली. मात्र, बाळ
वरळीत आदित्य ठाकरेंचा ( Aditya Thackeray ) निसटता विजय!
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. आदित्य ठाकरेंनी ( Aditya Thacheray ) मात्र, आपला वरळी हा मतदार संघ अवघ्या आठ हजार मतांनी राखला आहे. निवडणूकीच्या विजयानंतर त्यांनी निकालासंदर्भात प्रतिक्रीया दिली. "आजच्या निकालाने आमचा अपेक्षाभंग झाला. आता यात ईव्हीएमने किती प्रचार केला, ते पहावं लागणार आहे," असे म्हणत त्यांनी निकालाचे खापर ईव्हीएमवर फोडले.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असताना आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून नियमभंग केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
Aditya Thackeray आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात आघाडी आणि युती यांच्यात लढत होत असताना अनेक उमेदवारांच्या माध्यमांवर मुलाखती होत आहेत. पत्रकार उमेदवारांना झालेल्या कामांविषयी विचारत आहेत. तर उमेदवारही कामाचा आढावा देत आहेत. अशातच आता वऱळी मतदारसंघाचे आमदार आणि उमेदवार आदित्य ठाकरे यांनी माध्यमाने विचारलेल्या एका प्रश्नवर भरसभेतून पळ काढला आहे.
मुंबई : “मुंबईत विशेषतः मालवणी परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या लोकसंख्येमध्ये महाविकास सरकारच्या काळात मोठी वाढ झाली. त्याबद्दल ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’चा अहवाल आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर त्याचे खापर फोडू नका. तुमच्यात हिंमत असेल, तर कृपया या जिहादी प्रवृत्तीबाबत भूमिका स्पष्ट करा,” असे आवाहन मुंबई भाजपचे सचिव प्रतिक कर्पे ( Pratik Karpe ) यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना दिले.
mob leaching case महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात मॉब लिचिंगचे (mob leaching case) प्रकरण घडले होते. आता हे प्रकरण खोटे असल्याची सारवासारव उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेना उबाठा आदित्य ठाकरे यांनी असे कधी महाराष्ट्रात पाहिले आहे का? असा फेक नेरॅटिव्ह तयार करणारा प्रश्न पत्रकारांना केला आहे.
मुंबई : (MVA) मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभे राहणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘थीम पार्क’ हे प्रारंभीपासून वादाच्या भोवर्यात अडकले आहे. निव्वळ आकसबुद्धीच्या राजकारणापायी या प्रस्तावित ‘थीम पार्क’च्या विकासामध्ये अनेक अडथळे निर्माण करण्यात आले.
Aditya Thackeray वऱळी मतदारसंघातून मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना धारेवर धरले आहे. वरळी मतदारसंघात काही काम झाले नाही. यामुळेच आम्हाला संदीप देशपांडे यांना उमेदवारी द्यावी लागल्याचा मिश्कील टोला लगावला आहे.
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एक मोठा टप्पा पूर्ण होऊन लाखो मुंबईकर या मार्गावरून जलद प्रवासाचा आनंद घेत आहेत. मात्र हा प्रकल्प बांधत असताना वरळीच्या क्लिव्हलँड बंदर भागातील स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांनी या रोडला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या कोळी बांधवानी सत्तेत असणाऱ्या स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी सतत भेटीचा पाठपुरावा केला. मात्र, ठाकरे सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असणाऱ्या आदित्य ठाकरे यां
विधानसभा निवडणूकीसाठी उबाठा गटाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभेतून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात केदार दिघे यांना तिकीट देण्यात आले आहे.
मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका आरे-कुलाबा- सिपझचा पहिला आरे जेव्हीएलआर ते बीकेसी हा पहिला टप्पा नुकताच मुंबईकरांसाठी खुला झाला. मात्र, जो प्रकल्प वर्ष २०२४मध्ये मुंबईकरांसाठी पूर्ण क्षमेतेने सुरु होणे अपेक्षित होते त्यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टामुळे आज मुंबईकरांना या मेट्रो मार्गिकेसाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. इतकेच नाहीतर मविआकाळात झालेल्या प्रकल्प विलं
ज्या पध्दीतीने मुंबईतील अनेक भूखंड उबाठा सेनेने बळकावले तसेच धारावीमध्ये असणारा नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड दुस-या मुलाचे निसर्ग व प्राणी प्रेम दाखवून घराजवळची ही जागा बळकावयाची आहे म्हणूनच धारावीकरांची माथी भडकवली जात आहेत. निर्बुध्द आदित्य ठाकरे हे शहर नक्षलवाद्यांचे प्रवक्ते झाले आहेत, असे गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.
मुंबईत कंत्राटदार वॉर सुरु करणारा आदिपुरुष म्हणजे आदित्य ठाकरे आहेत, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. तुम्ही मुंबईच्या विकासाला खिळ घालू पाहात आहात का? असा सवालही त्यांनी केला. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंनी दापोलीतून विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी दिलं आहे. तसेच पुन्हा एकदा शिंदे साहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी शुक्रवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर दोन गटांत झालेल्या राड्यानंतर ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे आणि नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये गुरुवारी राजकोट किल्ल्यावर तुफान राडा झाला होता. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवप्रभूंचा पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींनी रोष व्यक्त करणे स्वाभाविक. परंतु, विरोधकांनी त्यात राजकारण साधावे, हे महाराष्ट्राला न पटणारे. महाविकास आघाडीचे नेते जणू हा पुतळा पडण्याची वाटच पाहत होते, अशी शंका घेण्याइत पत खालची पातळी त्यांनी गाठली.
राजकोट किल्ल्यावर बुधवारी दोन गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले असून त्यांच्यात जोरदार राडा झाला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बुधवारी निषेध आंदोलन केले. याचवेळी भाजपचे कार्यकर्तेही तिथे दाखल झाले आणि दोन गट आमनेसामने आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी गेले असता महाविकास आघाडी आणि नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यादरम्यान, उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली.
आदित्य ठाकरेंवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) च्या तीन केसेस दाखल आहेत, असा गौप्यस्फोट भाजप नेते नितेश राणेंनी केला आहे. तसेच याबाबत उद्धव ठाकरेंनी खुलासा न केल्यास मातोश्रीवर मोर्चा आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
"दिशा सालियनवर सामूहिक अत्याचार झाले, तेथे आदित्य ठाकरे होता का? आदित्यच्या निकटवर्तीयांनी तिला बाल्कनीतून ढकलले का? आदित्य ठाकरे आणि दिशा सालियनच्या मोबाइल टॉवरचे लोकेशन ८ तारखेला एकच होते का?, याची खरी उत्तरे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी द्यावीत. दिशा सालियनच्या जागी तुमच्या घरातील मुलगी असती, तर अशी लपवालपवी केली असती का? अशा प्रश्नांची सरबत्ती भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवार, दि. २४ जुलै रोजी केली. नरिमन पॉइंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात चांगल्या प्रकारे कारवाई झाली असती तर आज आदित्य ठाकरे तुरुंगात असते, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह हा आदित्य ठाकरेंचा डुप्लिकेट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी कुणाचाही मुलगा असला तरी त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या मुलावर कारवाई का झाली नाही? असा सवालही त्यांनी केला.
वरळीत राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांचा मुलगा आमदार झाला. तेव्हा त्यांना काहीही वाटलं नाही, असा पलटवार मनसे नेते अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी महायूतीला दिलेल्या पाठिंब्यावर टीका केली होती. काही जणांनी 'बिनशर्ट' पाठिंबा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर आता अमित ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.
मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
मोदीजींचा राजीनामा मागण्याआधी संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंचा राजीनामा मागावा, असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांना लगावला आहे. बुधवारी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावर आता राणेंनी त्यांचा जोरदार समाचार घेतला.
"विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे", अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २८ मे रोजी दिली.
डोंबिवली दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांचं महाराष्ट्रावर असलेलं प्रेम किती बेगडी आणि नकली आहे ते दिसलंय, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. दुर्घटनेनंतर डोंबिवलीकरांना मदत करण्यासाठी ते कुठेही दिसलेले नाहीत, असेही ते म्हणाले.
भाजपचे सरकार डोक्यावर बसल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील. मटण खायचे की भाजी, तेच सांगतील, असे मी म्हणजे तुमचा आदूबाळराजे म्हणतो. आपल्या मॅडम, आपले बारामतीचे साहेब जे जे म्हणतात ना, तेच म्हणालो. जसे भाजपला संविधान बदलायचेय, मुंबई तोडायची आहे, भाजपला लोकशाही नको वगैरे वगैरे. लोकांची पण कमाल आहे. आपण त्यांच्या जिवावर इथे दुसरी ‘मातोश्री’ बांधली आणि आवाज कुणाचा म्हणणारे ते कार्यकर्ते मुंबईतली घरे विकून मुंबईबाहेर गेले. जाऊ दे. आपले नवीन मतदार आहेत ना? सलामलेकुम!
आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार है असं लिहायला हवं, असा घणाघात शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला आहे. उबाठा गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली होती. यावर आता निरुपम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.