धारावीतील नेचर पार्कच्या भूखंडावर उबाठाचा डोळा

आमदार आशिष शेलारांचा गंभीर आरोप

    18-Oct-2024
Total Views | 18

dharavi

मुंबई, दि.१८ : ज्‍या पध्‍दीतीने मुंबईतील अनेक भूखंड उबाठा सेनेने बळकावले तसेच धारावीमध्‍ये असणारा नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड दुस-या मुलाचे निसर्ग व प्राणी प्रेम दाखवून घराजवळची ही जागा बळकावयाची आहे म्‍हणूनच धारावीकरांची माथी भडकवली जात आहेत. निर्बुध्‍द आदित्‍य ठाकरे हे शहर नक्षलवाद्यांचे प्रवक्‍ते झाले आहेत, असे गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.
 
धारवी पुर्नर्विकासाला विरोध करीत उबाठा नेते आदित्‍य ठाकरे यांनी काल घेतलेल्‍या पत्रकार परिषदेला प्रतिउत्‍तर देताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले, आदित्‍य ठाकरे हे निर्बुध्‍द सारखे अभ्‍यास न कराता बोलत आहेत. धारावीमध्‍ये ७० टक्‍के दलित, मुस्‍ल‍िम आणि मराठी माणसे आहेत त्‍यांना त्‍यांच्‍या हक्‍काची घरे मिळणार आहेत, मुंबई महापालिकेला १५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच, मुंबईकरांना ४३० एकरमधील ३७ टक्‍के जागेत खेळाचे मैदान, मनोरंजन मैदान यारखी मोकळी जागा मिळणार आहे. लोकांमध्ये एक वेगळया प्रकारची भावना निर्माण करून धारावीकरांना हे सरकार तुमच्या विरोधी आहे असं वातावरण निर्माण करणे, हा उबाठा आणि आदित्‍य ठाकरे यांचा नेरेटीव्‍ह सेट करण्‍याचा प्रयत्‍न आहे. हा एक आंतराष्‍ट्रीय कट असून शहरी नक्षलवाद्यांचे आदित्‍य ठाकरे हे प्रवक्‍ते झाले आहेत, असे आरोप आमदार अॅड आशि‍ष शेलार यांनी केला.
आज हे बोलतोय म्‍हणून आम्‍ही कंत्राटदार प्रेमी आहेत असेही ते आरोप आमच्‍यावर करतील पण त्‍याची तमा न बाळगता आम्‍ही आज मुंबईच्‍या, मुंबईकरांच्‍या हिताचे आहे म्‍हणून सत्‍य मांडण्‍यासाठी बोलणार आहोत. जे मुद्दे आम्‍ही मांडतो आहे त्‍याची उत्‍तरे आदित्‍य ठाकरे यांनी आणि खासदार वर्षा गायकवाड आणि त्‍यांच्‍या पक्षांनी द्यावी आम्‍ही कधीही खुल्‍या चर्चेला तयार आहोत, असे आव्‍हान ही त्‍यांनी केले.
७ लाखाचा आकडा कुठून आला ?

ज्या धारावी मध्ये घर किती ? सन २०००आधीची किती ? सन २००० ते २०११ची किती? आणि २०११च्‍या पुढे ज्याला आपण ती किती ? दोन माळयाची किती ?, निवासी आणि औद्योगिक गाळे किती याचा सर्वेच अद्याप पूर्ण झालेला नाही. आमच्‍या माहितीप्रमाणे केवळ २०हजार घरांचे सर्वेक्षण झाले आहे. अजून खूप मोठा विभाग बाकी असतानाही जो भ्रम. खोटं आणि कट केला जातो आहे. त्‍यांनी सात लाख घरे असा काल जो उल्‍लेख केला तो आकडा आला कुठून?, धारावीच्या शिवसेना शाखेत बसून खोटे आकडे निर्माण करण्याचे षडयंत्र आदित्य ठाकरे करीत आहेत.

या जागेवर मालकी डिआरपीची

धारावीतल्या या सगळ्या जागेची मालकी डिआरपी नावाच्‍या राज्य सरकारने स्‍थापन केलेल्‍या कंपनीची आहे. तर डि.आर.पी.पी.एल ही कंपनी पुनर्विकासाची कंत्राटदार म्हणून काम करणार आहे. त्‍यामुळे कंत्राटदाराला निवेदन फायदे असणारच आहेत ते स्‍वाभाविक आहे. त्‍या फायद्यातील ८० टक्‍के हिस्‍सा हा या स्पेशल बर्पज व्हेईकलला म्‍हणजे अदानीला तर २० टक्‍के राज्य सरकारला मिळणार आहे.
 
महापालिकेला जागेच्‍या मालकीचे पैसे मिळणार

ज्या जागा मालकाची जागा तुम्ही झोपडपट्टी पुनर्विकासाला घेता त्याला त्या जागेच्या रेडी रेकनरच्या २५% एवढी किंमत मिळते. याच नियमानुसार मुंबई महापालिकेची जागा जास्त असेल तर मुंबई महापालिकेसह, सरकारला पंचवीस टक्के मिळणार आहेत. मग तरीही आदित्‍य ठाकरे यांचा विरोध का, असा सवालही आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला. टेंडर न वाचता केवळ शहरी नक्षलवादी मित्र जेवढे सांगतील त्यांचे प्रवक्ते व्हायचं आणि धारावीचा विषय घेऊन माझ्या मराठी मुस्लिम आणि दलित बांधवांची माथी भडकवण्‍याचे काम आदित्‍य ठाकरे करीत असून आम्‍ही आता थेट जनतेशी संवाद साधणार आहोत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121