"आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात काम केले नाही"

    28-Oct-2024
Total Views | 61
 
Aditya Thackeray
 
मुंबई : वरळी मतदारसंघातून मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. याचपार्श्वभूमीवर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना धारेवर धरले आहे. वरळी मतदारसंघात काही काम झाले नाही. यामुळेच आम्हाला संदीप देशपांडे यांना उमेदवारी द्यावी लागल्याचा मिश्कील टोला लगावला आहे.
 
संदीप देशपांडे हे नक्कीच वऱळी मतदारसंघातून निवडून येतील हा माझा विश्वास असल्याचे प्रतिपादन अमित ठाकरे यांनी केले होते. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस हा २९ ऑक्टोबर असणार आहे. तर ४ नोव्हेंहरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. अशातच वरळीतून आदित्य ठाकरे निवडणूक लढवतील, तर दुसरीकडे अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असतील.
 
यामुळे आता राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील लढतीप्रमाणे अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे चुरस असणार आहे. दरम्यान, १० वर्षात पर्यावरण खात्याने कोणतेही काम केला नसल्याचा टोला अमित ठाकरेंनी लगावला आहे. आरे प्रकल्पातही त्यांनी ३५ हजारांपर्यतं झाडे कापून घेतली आहे. त्यनंतर अमित ठाकरे यांनी मी पर्यावरणासाठी काम करत राहणार असल्याचे सांगितले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121