'त्यांना' मेट्रोचा 'म' उच्चारण्याचा तरी अधिकार आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल
27-May-2025
Total Views |
मुंबई : मेट्रो-३ ला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मेट्रोचा 'म' उच्चारण्याचा तरी अधिकार असावा का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात पाणी शिरल्याने आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. यावर चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.
मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवार, २७ मे रोजी भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात मोठ्या प्रमाणात शिरले. त्यामुळे वरळी स्थानक ते आचार्य अत्रे चौक स्थानक (वरळी नाका) मेट्रो सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर यावरुन विरोधकांनी प्रचंड टीका केली.
यावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "ज्या मेट्रो-३ ला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कायम विरोध केला, ज्यांच्यामुळे मेट्रो-३ मुंबईकरांना २-३ वर्ष विलंबाने मिळते आहे, ज्यांच्यामुळे मेट्रो-३ चा खर्च १५ हजार कोटींनी वाढला, त्यांना मेट्रोचा 'म' उच्चारण्याचा तरी अधिकार असावा का?" असा सवाल त्यांनी केला आहे.