सरस्वती कोचिंग क्लासेसचे पाच विद्यार्थी सनदी लेखापाल( सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण.

    23-Jul-2025
Total Views | 26

मुंबई : सरस्वती कोचिंग क्लासेसचे कुमारी पवित्रा शेट्टी, कुमार प्रशांत जाधव, कुमारी गायत्री जाधव, कुमार वैभव गुंडाळ व कुमारी दिपाली विंचू हे मध्यम वर्गीय कुटुंबातील पाच माजी विद्यार्थी सनदी लेखापाल (सी. ए.) परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा सन्मान सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक श्री अजित कदम, श्री सुधाकर कदम व ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष रावराणे यांनी नुकताच केला.

दहावी, बारावी, बी.कॉम. परीक्षेतही ह्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण प्राप्त करून अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या सी. ए. परीक्षेतही घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना जिद्दीने सी. ए. होण्याचा या विद्यार्थ्यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.

ईश्वरी कृपा, आईवडिलांचे व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तसेच कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य, अथक प्रयत्न या मुळे वरील विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खासदार व केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल, आमदार श्री योगेश सागर, मा. नगरसेवक श्रीमती शुभदा गुढेकर, श्री श्रीकांत कवठणकर, श्री दिपक (बाळा) तावडे, सौ. प्रतिभा गिरकर, शिवसेना विभागप्रमुख श्री संतोष राणे, आपला माणूस श्री भूषण विचारे या व इतर अनेक मान्यवरांनी तसेच विभागातील सेवाभावी सामाजिक व शैक्षणिक संस्था, नातेवाईक आणि मित्र मंडळीने सी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

(Bihar election) नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आणि देशभर भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिहारमध्ये भाजपाप्रणित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या होत्या.ज्या यशस्वी ठरल्या. आता देखील या निकालानंतर मुंबई बाबत बोलताना 'मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर निवडून येईल',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.तर प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत..

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

(Local Body Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना, राज्यभरातील अनेक पक्षांकडून निरनिराळे निर्णय घेतले जात आहेत. (Local Body Election) अशातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. (Local Body ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121