Byculla : भायखळ्यात बांधकामस्थळी घडलेल्या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्य- तीन जखमी

    15-Nov-2025
Total Views |
 
Byculla
 
मुंबई : (Byculla) भायखळा (Byculla) पश्चिम येथील हबीब मॅन्शन,(Byculla)  हंस रोड परिसरात (Byculla) इमारतीच्या फाउंडेशन आणि पायलिंग कामादरम्यान माती खचल्याने शनिवारी दुपारी गंभीर दुर्घटना घडली. माती व चिखलाचा ढिगारा अचानक मजुरांवर कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत, अशी माहिती नायर रुग्णालयाकडून देण्यात आली.(Byculla)
 
दुर्घटना सव्वा दोनच्या सुमारास घडली. बांधकामस्थळी पायलिंगचे काम सुरू असताना जमिनीचा कडा सैल झाल्यामुळे मातीचा मोठा भाग अचानक खाली घसरला आणि मजुरांवर कोसळला(Byculla). घटनेनंतर सहकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून सर्वांना नायर रुग्णालयात हलवले. रुग्णालयातील तपासणीत राहुल (३०) आणि राजू (२८) यांना मृत घोषित करण्यात आले, तर सज्जाद अली (२५), सौबत अली (२८) आणि लाल मोहम्मद (१८) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम यांनी दिली.(Byculla)
 
हेही वाचा : Andheri Ghatkopar Link Road : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या रुंदीकरणाने बाधित ३७ बांधकामाचे निष्कासन
 
प्राथमिक माहितीनुसार, पायलिंगदरम्यान जमिनीची पकड सैल झाल्याने मातीचा मोठा ढिगारा खाली सरकला. दुर्घटनेच्या वेळी बांधकामस्थळी (Byculla) आवश्यक सुरक्षा उपाय पाळले गेले होते का, याचा तपास सुरू आहे. घटनेनंतर पोलिस आणि संबंधित प्रशासनिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तांत्रिक त्रुटी किंवा निष्काळजीपणामुळे अपघात झाला का, याची चौकशी सुरू आहे.(Byculla)