मुंबई : ( Dharavi Redevelopment Project ) धारावी पुनर्विकास प्रकल्प अर्थातच डीआरपी आणि महाराष्ट्र सरकारने परिशिष्ट – २ नुसार याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. दररोज शेकडो कुटुंबांना त्यांच्या नावांचा पुनर्विकास प्रकल्पात समावेश झाल्याची आनंदवार्ता मिळते आहे. अखेर आमचा संघर्ष संपणार असून आता लवकरच आम्हाला नवीन घरे मिळावी अशी मागणी पात्र धारावीकर करत आहेत.
एक लाखांहून अधिक कुटुंबांचे पात्रता सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता ते सर्वजण श्वास रोखून निकालाची वाट पाहत आहेत. पण ज्या कुटुंबांचे नाव या याद्यांमध्ये दिसत आहे, त्यांच्या दृष्टीने हा क्षण स्वप्न साकार झाल्यासारखा आहे. ते आनंदित आहेत, कारण आपल्या नव्या स्वप्नांच्या घरात पाऊल ठेवण्याची वेळ जवळ आली आहे.
हे पाहता धारावीकर आता या पुनर्विकासासाठी पूर्णपणे तयार आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागावरून हे स्पष्ट होते की, त्यांनी या परिवर्तनाला आपली संमती दिली आहे. पण डिआरपी इथेच थांबत नाही. तर १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान एक विशेष कागतपत्र संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्यांनी यापूर्वी आपली कागदपत्रे सादर केली नाहीत किंवा सर्वेक्षण पूर्ण केले नाही. त्यांना आता पुन्हा एक सुवर्णसंधी दिली जाणार आहे. डिआरपीकडून प्रत्येक रहिवाशाला नवे घर मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प आता फक्त एक कल्पना राहिलेली नाही. हा प्रकल्प आता वास्तवात रूप घेत असून धारावीवासीयांसाठी नवी उमेद घेऊन येत आहे.
मी धारावीत पहिल्या माळ्यावर राहते. आमचा यादीत नाव आल्याने आम्ही खूप खुश आहोत. आता कधी घर मिळणार याची वाट पहात आहोत. या झोपडपट्टीतून बाहेर जाऊन आम्हाला छान स्वतःचे घर मिळणार यात आमहाला खूप आनंद आहे. आमच्याकडे एक व्यक्ती जरी पाहुणे म्हणून आली तरी त्रास व्हायचा. घरात लिकेज, पाणी भरायचे याचा खूप त्रास होतो. नेवे घर मिळाले की वेगळे किचन, हॉल, बाथरूम सगळं असेल यामुळे आम्ही खूप खुश आहोत.
- आरती, धारावीकर
मी गेली ४० वर्षे धारावीत राहते आहे. सर्व्हेक्षणात आता आम्ही घरासाठी पात्र झाले आहोत. माल खूप आनंद झाला आहे. इतके वर्षे आम्ही खूप अडचणीत काढले आहेत. आमच्या घरी कोणीही येत नाही. पावसाळ्यात पाणी भरते. गळ्यापर्यंत पाणी यायचं. इतक्या अडचणी आणि संघर्षात जीव काढल्यानंतर आज आम्हाला घर मिळणार याचा खूप आनंद आहे. यादीत नाव आल्याने आम्ही खूप खुश आहोत. नवीन घरची अपेक्षा आहे. हे नवीन घर कसे असेल, हॉल कसा असेल याच विचारणे आम्ही आनंदात आहोत. महिलांनी याठिकाणी सार्वधिक त्रास काढला आहे. यातून आम्हाला अनेक आरोग्याचा समस्यांना सामोरे जावे लागले. हा सगळं त्रास संपणार आहे.
- अस्मिता, धारावीकर
मी गेली ३० वर्षे धारावीत राहतो. एसआरएचे सर्व्हेक्षण झाले. आम्ही इथे पहिल्या माळ्यावर राहतो. आम्ही देखील या प्रकल्पात पात्र झालो याचा आम्हाला खूप आनंद आहे. इतकी वर्षे आम्ही प्रतीक्षा केली ती प्रतीक्षा आता फळाला आली आहे. आमच्या पुढच्या पिढीला लवकरात लवकर हे स्वप्न साकार व्हावं इतकीच इच्छा आहे. ज्यांनी ज्यांनी अद्याप कागदपत्रे दिली नाहीत त्यांनी ही कागदपत्रे द्या आणि प्रकल्पात पात्र व्हा.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.