पाटणा : "बिहार निवडणुकी आधीच मतदारयादीतील गोंधळ समोर आला आहे. बिहारच्या मतदारयादीत मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांची नावे असून यामध्ये नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशचे नागरिक आहेत,” अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. या परदेशी लोकांकडे मतदारकार्ड, आधारकार्ड आणि रेशनकार्ड देखील आहेत. निवडणूक आयोगाने घरोघरी पडताळणी करून माहिती घेतली. यामध्ये मोठा खुलासा झाला आहे.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "त्यांची नावे अंतिम मतदारयादीत राहणार नाहीत. मतदारयादीतून बेकायदेशीर मतदारांना काढून टाकणे हा हेतू आहे. मतदार पडताळणीच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणादरम्यान, या वस्तुस्थितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण, काँग्रेससह महाआघाडीतील सर्व पक्ष या मोहिमेला विरोध करत आहेत.”
८० टक्के मतदारांकडून माहिती सादर
आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक मतदारांनी स्वतःबद्दल आवश्यक माहिती असून यामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक प्रविष्ट करून अर्ज सादर केले आहेत. तथापि, आयोगाने या कामासाठी दि. २५ जुलै ही शेवटची तारीख निश्चित केली आहे. परंतु, हे काम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
न्यायालयाचास्थगिती देण्यास नकार
यावर्षी ऑटोबर-नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता, मतदार पुनरीक्षणाचा मुद्दा देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विरोधी पक्षांनी ते थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ते थांबवण्यास नकार दिला, तर निवडणूक आयोगाला काही सूचना दिल्या.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दि. १ ऑगस्ट रोजीनंतर, योग्य तपासणीनंतर, त्यांची नावे दि. ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित होणार्या अंतिम यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत. दि. ३० सप्टेंबरनंतर आयोग या संख्येचे आकडेदेखील उघड करेल, अशी अपेक्षा आहे. बिहारमधील मतदारयादीच्या पुनरावलोकनांतर्गत मतदार गणना अर्ज सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. देशभरात मतदार पडताळणी केली जाईल, जेणेकरूनचुकीच्या मार्गाने कार्डमिळवून मतदार बनलेल्या परदेशी घुसखोरांना मतदारयादीतून काढून टाकले जाईल. यासाठी त्यांचे जन्मस्थान पडताळले जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.