New Rules from 1 July 2025: 'हे' आठ नवे नियम लागू!

    01-Jul-2025
Total Views | 11
 
New Rules from 1 July 2025
 
मुंबई : दि. १ जुलै २०२५ पासून देशात अनेक बदल करण्यात आले आहेत. रोजच्या दैंनदिन जीवनाला उपयुक्त असणाऱ्या गोष्टीबद्दल हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यात पॅनकार्ड, आधारकार्ड, रेल्वे तिकीट बुकिंग यांसह अन्य गोष्टींचासुद्धा समावेश आहे.
 
काय आहेत नवे नियम?
 
१) सिलिंडरच्या किंमतीत कपात :
 

New Rules from 1 July 2025 
 
देशभरात हॉटेल व्यवसायासाठी व्यावसायिक सिंलिडरला मोठी मागणी असते, नव्या बदलानुसार आता हा व्यावसायिक सिलिंडर 58 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
 
२) क्रेडिट कार्ड पेमेंट :
 
New Rules from 1 July 2025 
 
तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? जर वापरत असाल तर हा बदल तुमच्यासाठीच आहे. सरकारी आणि खासगी बँकांनीही आपल्या काही नियमात बदल केले आहेत, या नव्या बदलानुसार सर्व क्रेडिट कार्ड वापरर्कत्यांना क्रेडिट कार्डचे बिल सिस्टमद्वारे भरावे लागणार आहे. या नव्या बदलाचा थेट परीणाम हा UPI अॅप्सवर होईल.
 
३) रेल्वे आरक्षण बुकींग :
 
 
New Rules from 1 July 2025
 
रेल्वेचा प्रवास सर्वजणच करतात. आता रेल्वेनेसुद्धा आपल्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आतापर्यंत रेल्वे सुटण्याच्या फक्त चार तास आधी आरक्षण चार्ट जारी केला जायचा पण, आतापर्यंत रेल्वे सुटण्याच्या फक्त चार तास आधी आरक्षण चार्ट खुला केला जायचा. पण,आता आयआरसीटीसीने हा नियम बदलत आरक्षण चार्ट आठ तास आधीच तयार होईल असा बदल केला आहे.
 
४) जीएसटी रिटर्न :
 
 
New Rules from 1 July 2025
 
जीएसटीने आपला नव्या बदलात असे जाहीर केले की, पुर्वीप्रमाणे आता GSTR-3B फॉर्म एडिट करता येणार नाही. आणि आता नव्या बदलात कोणीही करदाता तीन वर्षाने मागच्या तारखेचा जीएसटी रिटर्न भरू शकणार नाही.
 
५) UPI चे नवा नियम :
 
 
New Rules from 1 July 2025
 
बदलेल्या नव्या नियमात UPI चा देखील समावेश आहे. आतापर्यंत नाकारलेल्या चार्जबॅक क्लेमची पुन्हा प्रक्रिया करण्यासाठी बँकांना NPCI कडून मान्यता घेणे आवश्यक होते. परंतू आता नव्या बदलानुसार बँक आता NPCI च्या मंजुरीशिवाय चार्जबॅक क्लेमची प्रक्रिया करू शकतील.
 
६) आयकर रिटर्न भराण्यासाठी मुदतवाढ :
 
 
New Rules from 1 July 2025
 
आयकर विभागाने आयटीआर रिटर्न भरण्याची वेळ मर्यादा वाढवत 31 जुलै असणारी शेवटची तारीख 15 सप्टेंबरपर्यंत केली आहे. या नव्या बदलात आता ४६ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळेल.
 
७) रेल्वेच्या तत्काळ बुकिंग आणि तिकिटदरात बदल :
 
 
New Rules from 1 July 2025
 
नव्या बदलात आता तुम्हाला रेल्वेचे तत्काळ तिकिट बुक करताना आधारकार्ड ची पडताळणी करणे आवश्यक आहे. रेल्वेच्या तिकिटदरातसुद्धा वाढ झाली असून आता एसी कोचकरता प्रति किलोमीटर २ पैसे तर नॉन-एसी कोचकरता प्रति किलोमीटर १ पैसे अशी ही दरवाढ करण्यात आली आहे.
 
८) पॅन कार्ड बदल :
 
New Rules from 1 July 2025
 
आता जर कोणाला नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असल्यास त्या व्यक्तीचे आधारकार्ड असणे अनिवार्य असेल. यापुर्वीच्या पॅन कार्ड नियमानुसार अर्जकर्त्याचा जन्म दाखला किंवा वैध कागदपत्र असणे पुरेसे होते. परंतू आता आधारकार्डविना पॅन कार्डसाठी केलेला अर्ज हा अवैध ठरेल.
 
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121