देशव्यापी ई – पासपोर्ट सेवेस प्रारंभ – परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर
24-Jun-2025
Total Views | 20
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी १३ व्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त पासपोर्ट सेवा कार्यक्रमाच्या (पीएसपी) पुढील टप्प्याची आणि देशव्यापी ई-पासपोर्ट सेवा सुरू करण्याची घोषणा केली.
गेल्या दशकात पासपोर्ट सुविधांमध्ये मोठा बदल झाला आहे, २०१४ मध्ये जारी केलेल्या पासपोर्टची संख्या ९१ लाखांवरून २०२४ मध्ये १.४६ कोटी झाली आहे. पासपोर्ट सेवा कार्यक्रमाची आवृत्ती २.० देशभरात सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारण्यासाठी उच्च दर्जाच्या, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश आहे, असे परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर म्हणाले.
डॉ. जयशंकर यांनी ई-पासपोर्ट उपक्रमाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, ई-पासपोर्टमधील संपर्करहित चिप-आधारित डेटा रीडिंगसह प्रवास सुलभ होतो आणि इमिग्रेशन प्रक्रिया जलद होतो. यावेळी त्यांनी एमपासपोर्ट पोलिस अॅपच्या लाँचचा देखील उल्लेख केला, ज्यामुळे २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलिस पडताळणीचा वेळ ५-७ दिवसांनी कमी झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.