दहशतवाद तुमच्याही घरात येणारच – डॉ. जयशंकर यांचा युरोपला इशारा
12-Jun-2025
Total Views | 17
नवी दिल्ली : दहशतवाद हा केवळ भारत – पाकिस्तानदरम्यानचा मुद्दा नाही. दहशतवाद हा तुमच्या घरातही येणारच, असा स्पष्ट इशारा परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी युरोपला दिला आहे.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ब्रुसेल्स दौऱ्यादरम्यान युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि ईयूच्या परराष्ट्र व्यवहार प्रमुख काजा कल्लास यांची भेट घेतली. यादरम्यान जयशंकर यांनी भारताचे धोरणात्मक महत्त्व, त्याची जागतिक स्थिती अधोरेखित केली आणि युरोपियन युनियनच्या प्रमुख धोरणांवर आपले आक्षेपही व्यक्त केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यात एकता दाखवल्याबद्दल जयशंकर यांनी उर्सुला वॉन डेर लेयन यांचे कौतुकही केले.
डॉ. जयशंकर यांनी दहशतवादाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ओसामा बिन लादेन हा दहशतवादी वर्षानुवर्षे पाकमधील एका शहरात सुरक्षितपणे राहत होता. ही बाब जगाला समजून घ्यावी लागेल. दहशतवाद हा केवळ भारत आणि पाकदरम्यानचा मुद्दा नाही. हा दहशतवादाचा मुद्दा असून दहशतवाद हा एक ना एक दिवस तुमच्याही घरात येणारच, असाही इशारा डॉ. जयशंकर यांनी युरोपला दिला आहे.