श्री. सचिन तालेवार महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदी रूजू

Total Views |
Sachin Talewar as new Director of Mahavitaran

मुंबई : महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. सचिन तालेवार यांनी बुधवारी (दि. ७) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून कार्यरत होते. श्री. तालेवार गेल्या २८ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
नवनियुक्त संचालक (प्रकल्प) श्री. सचिन तालेवार मूळचे नागपूर जिल्ह्याचे असून त्यांचे शालेय शिक्षण छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे झाले आहे. विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर श्री. तालेवार १९९७ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून चंद्रपूर येथे रूजू झाले. पदोन्नतीने सहायक अभियंता म्हणून कार्यरत असताना सन २००६ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर त्यांनी वर्धा, नागपूर व जालना येथे काम केले आहे. दरम्यान महावितरणकडून त्यांची गूडगाव येथील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधील (एमडीआय) एनर्जी मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमा इन बिझीनेस मॅनेजमेंट (पीजीडीएम) अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती. सन २००७-०८ मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

त्यानंतर सन २०१६ मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीमध्ये श्री. सचिन तालेवार यांची अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर लातूर येथे काम केले. तर सन २०१८ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे त्यांची मुख्य अभियंता म्हणून निवड झाली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी जून २०१८ ते डिसेंबर २०२२ पर्यंत काम केले. बदलीद्वारे छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना मे २०२३ मध्ये श्री. तालेवार यांची इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून निवड झाली. या कंपनीत ते दोन वर्षांपासून कार्यरत होते. त्यानंतर महावितरणचे संचालक (प्रकल्प) म्हणून नुकत्याच झालेल्या थेट भरती प्रक्रियेत त्यांची निवड झाली आहे.

‘महावितरणच्या ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजनेसह (आरडीएसएस) विविध योजनांमधून पायाभूत वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांसोबतच प्रामुख्याने सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सर्व योजनांना आणखी गती देत कामे लवकर पूर्ण करण्यात येईल’, असे महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. सचिन तालेवार यांनी सांगितले.

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com