विकसित भारतासाठी आवश्यक आहे अंत्योदयाचे तत्वज्ञान – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सवाची सांगता

    25-Apr-2025
Total Views | 20
विकसित भारतासाठी आवश्यक आहे अंत्योदयाचे तत्वज्ञान – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने त्याच ऐतिहासिक स्थळी, त्याच दिवशी, साठ वर्षांनी, २२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ आयोजन करण्यात आले होते.

आज या कार्यक्रमाच्या समारोपाला महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल जी, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा जी, दीनदयाळ शोधसंस्थेचे अध्यक्ष श्री अतुल जैन जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश सोनी जी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये बोलताना आदरणीय राज्यपाल म्हणाले, "जेव्हा संपूर्ण जग कोविडशी झुंजत होते, त्यावेळी आपण प्रत्येक जण अतिशय आतुरतेने लस येण्याची वाट बघत होतो. जेव्हा लस तयार झाली, तेव्हा जगभरातील सर्वच मेडिकल कंपन्या त्या लसीचे पेटंट घेण्याच्या शर्यतीत लागल्या, जेणेकरून त्यातून पैसे कमावता येतील. पण त्या वेळी मोदीजींनी असे केले नाही. संपूर्ण भारताला आणि जगालाही मोदीजींनी लस पुरवली आणि आजही त्याची आठवण जग ठेवत आहे. मोदीजींना हा विचार कुठून आला, या बाबत चिंतन केल्यास त्याची मुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शिकवणीत आढळतात. विकसित भारतासाठी आज प्रत्येक व्यक्तीची प्रगती होणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी पंडितजींची शिकवण अतिशय महत्त्वाची ठरते. आज तरुणांपर्यंत सुद्धा त्यांचे विचार पोहोचायला हवेत, जेणेकरून आपल्या भविष्यातील नेत्यांची तत्त्वे आणि मूल्ये पक्की असतील. आज याठिकाणी सांगताना अतिशय आनंद होत आहे की, रतन टाटा कौशल्य विद्यापीठात आम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार रुजवणार आहोत. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मी अभिनंदन करतो की, त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि पंडितजींच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली."

‘एकात्म मानवदर्शन’ आणि पंडितजींचे आर्थिक चिंतन याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले, "लहानपणापासून एकात्म मानवदर्शनाचा विचार केवळ ऐकला नाही, तर तो जीवनात उतरवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. पंडित दीनदयाळ उपाध्यायजींनी आज जगात काय घडणार हे दशकांपूर्वीच जाणले होते. भांडवलशाही, मार्क्सवाद यांसारख्या विचारधारा आल्या, पण माणसाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारे तत्त्वज्ञान फक्त भारतातून, एकात्म मानवदर्शनाच्या रूपात पुढे आले."

पंडितजींनी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जाऊन 'अंत्योदय'चा विचार मांडला. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास व्हावा, प्रत्येकाला काम मिळावे, आरोग्यसेवा मोफत मिळावी, ही भूमिका स्पष्ट होती. आज मोदींनी आयुष्मान भारतच्या माध्यमातून ६२ कोटींहून अधिक भारतीयांना मोफत विमा दिला; पक्की घरे, गॅस, रोजगार, अन्नधान्य यासाठीच्या सर्वच योजनांतून पंडितजींचा विचार कृतीत उतरवला.

आज स्वप्न आहे 'विकसित भारत' घडवण्याचे आणि तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल. गुलामीची मानसिकता झटकून आपल्या इतिहासाचे, आपल्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करावे लागेल. हाच पंडितजींचा खरा संदेश आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे."

प्रसंगी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, "आज आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे विचार प्रत्यक्षात उतरत आहेत, याचा मला अभिमान आहे. मलबार हिल मतदारसंघाचा आमदार या नात्याने त्या परिसरातील सामान्य नागरिकांपर्यंत पंडितजींचे विचार पोहोचवावेत, या उद्देशाने कोस्टल रोडजवळ त्यांच्या नावाचा चौक निर्माण केला. त्याचप्रमाणे तेथे एकात्म मानवदर्शन आणि पंडितजींचा जीवनपट उलगडणारी प्रदर्शनी स्थापित केली. पंडितजींच्या पुण्यतिथीला, ११ फेब्रुवारी रोजी, आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते सदर चौकाचे आणि प्रदर्शनाचे लोकार्पण झाले. त्याच वेळी एकात्म मानवदर्शनाचा हिरक महोत्सव साजरा करावा, ही संकल्पना माझ्या मनात आली आणि ती आज साकार झाली, याचा आनंद आहे. आदरणीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांना जेव्हा या कार्यक्रमाबद्दल समजले, तेव्हा त्यांनी असा प्रबोधनात्मक कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजमध्ये व्हायला हवा, याबाबत मी स्वतः सूचना देईन, असे सांगितले. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो."

सदर कार्यक्रमासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव समिती’ कार्यरत आहे. या समितीचा अध्यक्ष या नात्याने पंडितजींचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आम्ही नेहमीच करत राहू, असे श्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश सोनी यांनी भारताच्या विकासाची संकल्पना काय आहे आणि आपल्या संस्कृतीशी तिचे मूळ कसे जोडले गेले आहे, याबाबत आपले मौलिक विचार मांडले.

या चार दिवसांच्या महोत्सवात भू-सांस्कृतिक राष्ट्रवाद, भारत का ‘स्व’, लोकमत परिष्कार, भारताची विकासाची व्याख्या, पंडित दीनदयाळजींचे आर्थिक चिंतन या सारख्या विषयांवर श्रोत्यांना विचारमंथन ऐकायला मिळाले आणि आज या कार्यक्रमाची सांगता झाली.

अग्रलेख
जरुर वाचा

'ती' चप्पल कोल्हापुरीच! समाजमाध्यमांवरील टीकेनंतर 'प्राडा'ने मौन सोडले

इटली येथे पार पडलेल्या प्राडा कंपनीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलांचा वापर करत, त्याला ' इटालियन लेदर फुटवेअर डिझाईन' म्हणून विकणे, आता प्राडाला चांगलंच महागत पडलं आहे. प्राडा या कंपनीने आपल्या नावाचा टॅग लावत कोल्हापुरी चपला तब्बल १ लाखापेक्षा जास्त किंमतीने विकण्याचा घाट घातला होता. प्राडाच्या या कारभरानंतर, त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली होती. सोशल मिडीयावर याबद्दल प्रतिक्रीयांचा पाऊस तर पडलाच, त्याचबरोबर कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कारागीरांनी सुद्धा संताप व्यक्त केला होता. परंतु आता प्राडाने..

गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल - येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करु भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची माहिती

गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल - येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करु भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची माहिती

स्वयंपुनर्विकासाचा विषय पुढे जावा, योजनेकारिता पैसे उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली ‘दरेकर समिती’ नेमली. हे जबाबदारीचे शिवधनुष्य आहे. जनतेचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून अपार कष्ट करत मी महाराष्ट्राचा दौरा केला, बैठका घेतल्या. ३१३ पानांचा अहवाल तयार असून त्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर पुढील आठवड्यात सरकारला सादर करू, अशी माहिती भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष व दरेकर समितीचे प्रमुख प्रविण दरेकर यांनी दिली...

योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र

योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र

भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा विचार आपल्याला पदोपदी आढळून येतो. याच पारंपरिक विचारांचा, आधुनिक शिक्षण व्यवस्थेसोबत मेळ साधत, भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी भारतातील ४ विद्यापीठांनी एकत्र येऊन, सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याच्या अंतर्गत भारतीय शिक्षणव्यवस्था, आयुर्वेद, योगा या गोष्टींचा समावेश आहे. या कराराच्या माध्यमातून पतंजली विद्यापीठ, राजा शंकर शाह विद्यापीठ, हेमचंद यादव विद्यापीठ, आणि महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय ही चार विद्यापीठं एकत्र आलेली आहेत. पतंजली विद्यापीठाचे..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121