आता या बँकाची कर्जे स्वस्त होणार, रेपो दर कपातीचा परिणाम

मोठ्या बँकांकडून कर्जांवरचे व्याजदर घटवण्यास सुरुवात

    12-Apr-2025
Total Views | 13
repo
 
  
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या रेपो दरांत आणखी पाव टक्क्याची म्हणजे ०.२५ टक्क्यांची कपात करत सर्वसामान्यांना तसेच उद्योगजगताला एक सुखद धक्का दिला. आता रेपो दर ६ टक्क्यांवर आणण्यात आले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर आता बँकांकडून दिली जाणारी कर्जे स्वस्त होणे अपेक्षित होते. त्यानुसार आता सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्य बँकांकडून त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांवरचे व्याजदर घटवण्यास सुरुवात झाली आहे. याचा फायदा गृहकर्ज, वाहनकर्ज धारकांना जास्त होणार आहे.
 
बुधवारी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरकपातीचा निर्णय जाहीर होताच सार्वजनिक क्षेत्रातील दोन मोठ्या बँका बँक ऑफ इंडिया आणि युको बँक या दोन्ही बँकांनी आपले कर्जांवरचे व्याजदर घटवले. बँक ऑफ इंडियाचे व्याजदर आता ९.१० टक्क्यांवरुन ८.८५ टक्क्यांवर आणले गेले आहेत. त्याचबरोबर युको बँकेने त्यांचे व्याजदर ८.८ टक्क्यांवर आणले. यांच्यानंतर आता बँक ऑफ बडोदानेसुध्दा आपले व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी केले आहेत. प्रामुख्याने लघु व मध्यम उद्योग क्षेत्र तसेच किरकोळ विक्रेत्यांना दिली जाणारी कर्जे यांचा त्यात समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी महत्वाची बँक असलेल्या पीएनबी बँकेकडूनही व्याजदर घटवले गेले आहेत. त्यांनी त्यांचे रेपो दराशी निगडीत व्याजदर ०.२५ टक्क्यांनी घटवले आहेत. युको बँकेनेही आपले कर्जांवरचे व्याजदर ८.८० टक्क्यांपर्यंत घटवले आहेत.
 
रेपो दर घटवल्याचा फायदा आता गृहकर्ज धारकांना होणार आहे. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत गृहखरेदी मंदावली होती. त्याला आता चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “रेपो दरांमधील कपात ही थेट कर्जे स्वस्त होण्यात रुपांतरीत होत असल्याने आता कर्जे स्वस्त होतील ज्याचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे. त्याचा चांगला परिणाम लवकरच दिसायला लागेल” असे मत शापूरजी पालनजी रिअल इस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक व्यंकटेश गोपालकृष्णन यांनी मांडले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121