भारताचा बांगलादेशला समुद्रकोंडीचा धडा

- पंतप्रधान युनूस यांच्या वादग्रस्त विधानाला भारताचे उत्तर

    11-Apr-2025
Total Views | 57
 
India on Prime Minister Yunus controversial statement
 
नवी दिल्ली : ( India on Prime Minister Yunus controversial statement ) बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी ईशान्य भारताची कोंडी करण्याच्या वल्गना करताच, भारताने आता त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भारताने आता बांगलादेशला व्यापारासाठी बंगालच्या उपसागरातील भारतीय किनारा वापरण्याची परवानगी दिली होती. आता भारत सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार बांगलादेशला भारतीय किनारा वापरण्याची बंदी करण्यात आली आहे.
 
आता बांगलादेशला त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारतातील किनारी प्रदेशावरील बंदरे, विमानतळ आता वापरता येणार नाही. भारताने केलेल्या या कारवाईमुळे बांगलादेशला चांगलाच दणका बसला आहे. भारत सरकारने दि. २९ जून २०२० रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यात बांगलादेशला त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी बंगालच्या उपसागरातील बंदरे आणि विमानतळ वापरू देण्यास परवानगी दिली होती.
 
या सवलतीस भारतीय व्यापार्‍यांनी आणि त्यात प्रामुख्याने वस्त्रोद्योग क्षेत्राकडून ही सवलत मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. तरी भारत सरकारने ती सवलत सुरूच ठेवली होती. आता मात्र बांगलादेशची मोठी कोंडी होणार असून भारतातील उद्योगक्षेत्राला आता त्याचा फायदा होणार आहे. भारत सरकारने दि. ८ एप्रिल रोजी त्याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढले आहे.
 
काय म्हणाले होते मोहम्मद युनूस?
 
बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी त्यांच्या चीन दौर्‍यात भारतविरोधी गरळ ओकली होती. “भारताची ईशान्येकडील सात राज्ये ही जमिनीने वेढलेली आहेत. त्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग नाही. त्यामुळे त्यांना बांगलादेशच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. ही बाब चीनच्या पथ्थ्यावरच पडणारी आहे,” असे युनूस म्हणाले होते.
 
भारत सर्वसमावेशक दृष्टिकोनातून सहकार्याचा पुरस्कर्ता : एस. जयशंकर
 
मोहम्मद युनूस यांच्या बाष्कळ बडबडीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या खास संयत शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले की, “भारत हा सर्वसमावेशक आणि सहकार्यातून विकास साधण्याला महत्त्व देणारा देश आहे. भारताकडे बंगालच्या उपसागराचा ६ लहजार, ५०० किमीचा सर्वाधिक लांबीचा किनारा आहे. त्यामुळे भारताने सर्व ‘बिमस्टेक’ देशांना त्यांच्या देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जसे की रेल्वे, रस्तेबांधणी यांसाठी मदत केली आहे. त्याचबरोबर आसियान राष्ट्रांनादेखील भारताने मदत केली आहे. ईशान्य भारत या सर्व राष्ट्रांच्या विकासाच्या समन्वयाचे केंद्र बनत आहे. भारतासाठी हे महत्त्वाचे आहे,” असे म्हणत जयशंकर यांनी मोहम्मद युनूस यांना सुनावले. 
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121