मुंबईतील नागपाडा परिसरात ४ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू

    09-Mar-2025
Total Views |
 
Mumbai
 
मुंबई : मुंबईमधील नागपाडा परिसरात ४ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे, त्यात एकजण बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी ९ मार्च २०२५ रोजी दुपारी बारा वाजता ही घटना घडली आहे. पाण्याची टाकी साफ करताना कर्मचाऱ्यांचा जीव गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
 
घडलेल्या घटनेत मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असलेल्या खासगी इमारतीत पाण्याची टाकी असलेल्या ठिकाणी ५ कामगार काम करत होते. त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी पाचपैकी चौघेजण मृत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
 
 
 
हसीपाल शेख वय वर्षे १९, राजा शेख वय वर्षे २०, जिआउल्लाह शेख वय वर्षे ३६ आणि इमांडू शेखचे वय ३८ यांच्यावर सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत ४ कामगार आणि एक जण उपचार घेत आहेत.दरम्यान, मिंट रोड, नागपाडा या ठिकाणी कामगारांच्या मृत्यूची ही दुर्दैवी घटना घडली.