एलएनटी कंपनीचे ऐतिहासिक पाऊल, एक दिवसाची मासिक पाळी रजा मिळणार

कॉर्पोरेट जगताकडून मोठ्याप्रमाणावर स्वागत

    07-Mar-2025
Total Views |
subra
 
 
 
मुंबई : काही दिवसांपूर्वी आठवड्याला ९० तास काम करण्याच्या मुद्द्यावरुन अनेकांच्या टीकेचा मारा झेलाव्या लागलेल्या, एलएनटी कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यन यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक ठरु शकेल अशी घोषणा केली आहे. महिला आणि त्यांना मासिक पाळी दरम्यान सोसाव्या लागणाऱ्या अडचणींची दखल घेत, महिन्याला एक दिवसाची मासिक पाळी रजा मंजूर केली आहे. एलएनटी मधील जवळपास ५ हजारांहून अधिक महिला कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. एलएनटी कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत संपूर्ण कॉर्पोरेट जगताकडून होत आहे.
 
कंपनीकडून याबद्दल एक निवेदन प्रस्तुत करण्यात आले आहे. ‘एलएनटी कंपनीकडून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एलएनटी कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यन यांनी महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसाच्या मासिक पाळी रजेची भेट दिली आहे. कंपनीकडून घेण्यात आलेली हा अतिशय पुरोगामी आणि दूरदर्शी निर्णय आहे. कंपनीच्या या निर्णयाचा कंपनीतील जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांना फायदा होईल.’ असे एलएनटी कंपनीकडून प्रस्तुत करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ९० दिवस काम केले पाहीजे असे वक्तव्य केल्याने एलएनटी कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यन हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. एल एन टी कंपनीच्या एका मीटींगचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सुब्रमण्यन म्हणत होते की रविवारी नवरा बायको किती वेळ एकमेकांचे चेहरे बघत बसणार आहेत. त्यापेक्षा कामाला या. या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. समाजमाध्यमांवरही जोरदार टिकेला त्यांना सामोरे जावे लागले होते.