१०८ कलाकारांनी १०८ मिनिटांत रेखाटली भगवान शिवाची १०८ रूपे

    03-Mar-2025
Total Views | 12

Prayagraj Shiva Fest

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Prayagraj Shiva Fest) 
प्रयागराजच्या अरैल सेक्टर २३ मधील परमार्थ निकेतनच्या शिबिरात नुकताच 'शिवा फेस्ट' हा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या दिव्य कला महोत्सवात १०८ कलाकारांनी १०८ मिनिटांत भगवान शिवाची १०८ रूपे कॅनव्हासवर रेखाटली. या कार्यक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. कार्यक्रमाची सुरुवात परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वती जी आणि साध्वी भगवती सरस्वती जी यांच्या प्रार्थनेने झाली. शिवा फेस्ट ही केवळ चित्रकला स्पर्धा नव्हती, तर तो अध्यात्म, कला आणि संगीत यांचा भव्य संगम होता.

हे वाचलंत का? : हिंदी तो बहाना हैं, हिंदू असली निशाना हैं...

कलाकार आपल्या कुंचल्याने भगवान शंकराची १०८ रूपे कोरत असताना आणि संपूर्ण वातावरण देवत्व आणि भक्तीमय झाले होते. या कार्यक्रमाला भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, ललित कला अकादमी आणि पतंजली योगपीठ यांचे सहकार्य लाभले. 'ॲग्रेशन शिवा' या पेंटिंगने देशभरात प्रसिद्धी मिळवलेले कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार करण आचार्य यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.


Prayagraj Shiva Fest

स्वामी चिदानंद सरस्वतीजी म्हणाले, कला आणि भक्ती एकत्र आली की नवा इतिहास घडतो. शिवा महोत्सवाने केवळ शिव तत्वाचे अप्रतिम चित्रणच केले नाही तर कलाकारांना त्यांच्या साधना आणि भक्तीशी जोडण्याची दैवी संधीही दिली. साध्वी भगवती सरस्वती जी म्हणाल्या, हा कार्यक्रम महाकुंभाचा आत्मा अधिक खोलवर अनुभवण्याचे माध्यम बनला. प्रत्येकाला शिवभक्तीच्या रंगात रंगून जाण्याची संधी देणारा हा कला आणि अध्यात्माचा दैवी संगम होता.


अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121