नेपाळमध्ये राजेशाहीच्या समर्थनार्थ आंदोलनात योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र

    11-Mar-2025
Total Views | 16

Photo of Yogi Adityanath at a protest in support of the monarchy in Nepal
 
नवी दिल्ली: ( Yogi Adityanath ) नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही प्रस्थापित करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. विशेष म्हणजे आंदोलनामध्ये समर्थकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही छायाचित्र झळकविले आहे.
 
नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शाह रविवार, दि. ९ मार्च रोजी कडक सुरक्षेत काठमांडूमध्ये पोहोचले. तेथे राजेशाही समर्थक कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आधीच उपस्थित होते. पोखरा येथून सिम्रिक एअरच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून ज्ञानेंद्र त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच, राजेशाही समर्थक राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या नेत्यांसह शेकडो समर्थकांनी त्यांच्या बाजूने घोषणाबाजी सुरू केली.
 
यावेळी समर्थकांनी ‘आम्हाला आमचा राजा परत हवा आहे’, ‘संघीय प्रजासत्ताक व्यवस्था संपवा’, ‘राजेशाही पुनर्स्थापित करा’ आणि ‘राजा आणि देश आम्हाला आमच्या जीवापेक्षा प्रिय आहेत’ असे लिहिलेले फलक हातात घेतले होते. देशाच्या विविध भागातील धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर ज्ञानेंद्र पोखराहून काठमांडूला परतले. विमानतळाबाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्ञानेंद्र यांचे छायाचित्र आणि राष्ट्रध्वज घेऊन मोटारसायकलवरून आलेल्या शेकडो समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. राजेशाहीच्या समर्थकांनी यावेळी आपल्या हाती राजे ज्ञानेंद्र यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र असलेले पोस्टरही झळकविले.
 
योगी आदित्यनाथ आणि नेपाळचे राजघराणे
 
रॅलीमध्ये योगी आदित्यनाथ यांचा फोटो प्रदर्शित होणे समाजमाध्यमांसह नेपाळी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. २००८ सालापर्यंत नेपाळ हिंदू राष्ट्र होते. नंतर ते धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. योगी आदित्यनाथ यांनी २०१५ साली नेपाळ धर्मनिरपेक्ष होण्यास विरोध केला होता. ते नेपाळला हिंदू राष्ट्र ठेवण्याच्या बाजूने होते. त्याचप्रमाणे, गोरखनाथ मठाचे नेपाळच्या राजघराण्याशी जुने नाते आहे. नेपाळचे माजी राजघराणे गोरखनाथ पंथाशी संबंधित आहे. २०१७ साली नेपाळमध्ये झालेल्या ‘विराट हिंदू महासंमेलना’साठी माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांनी योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित केले होते. नेपाळ भूकंपानंतर (२०१५), गोरखनाथ मठाने मदत कार्यात भाग घेतला आणि मंदिरांच्या पुनर्बांधणीत योगदान दिले. योगी आदित्यनाथ यांच्या समर्थकांनी नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी अनेक वेळा निदर्शने केली आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121