हाता-पायांची बोटे कापत कट्टरपंथींनी युवकाची केली अमानुषपणे हत्या
09-Jan-2025
Total Views |
फरीदाबाद : एका हिंदू तरुणाचा मृतदेह फरीदाबाद येथील एका जंगलामध्ये अस्ताव्यस्त स्वरूपात पडलेला होता. संबंधित मृतदेह हा दीपक कुमार नावाच्या व्यक्तीचा असल्याचे सांगण्यात आले. ही घटना बुधवारी ८ जानेवारी २०२५ रोजी फरीदाबाद येथे घडली होती. दीपक हा १६ डिसेंबरपासून फरार होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी दीपक फरार असल्याची तक्रार केली. दीपकचा मृतदेह पाहिल्यानंतर मृतदेहाची काही बोटेही गायब असल्याचे दिसून आले होते.
पीडित दीपकचे कुटुंब हे सेक्टर ६२ मध्ये वास्तव्यास होते. पीडितेचा भाऊ दिलीपने माहिती दिली की, दीपक १६ डिसेंबर रोजी दिसला होता. त्यानंतर दीपकच्या मृतदेहाची माहिती हाती लागताच पीडितेची ओळख पटली.
यावेळी स्थानिक पोलिसांनी या घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. बेपत्ता व्यक्तीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ डिसेंबरपासून पोलिस शोध घेत आहेत. आतापर्यंत, दीपकचा मृतदेह बादशाह खान सिव्हिस रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.
दीपकचा भाऊ दिलीप याने केलेल्या तक्रारीची प्रत सोशल माध्यमांवर शेअर केली होती. तक्रारीत दिलीपने नमूद केले होते की, त्याने फक्रुद्दीन, इद्रीस, अन्वर, आझाद, सोहेल, आणि इतर काही व्यक्तीविरोधात तक्रार केली. दिलीपच्या तक्रारीनुसार, दीपक हा एका अल्पवयीन मुलीच्या एका प्रकरणाचा साक्षीदार होता. त्यामुळे संबंधित आरोपींनी दीपकला धारेवर धरले असून दीपकशी त्यांचे वैर निर्माण झाले होते.
याप्रकरणात फरिदाबात पोलिसांनी सांगितले की, त्यांनी याप्रकरणाची दखल घेतली. यामध्ये आरोपींची शोधमोहिम सुरू ठेवण्यासाठी एक विशिष्ट पथक स्थापन करण्यात आले. काही माध्यमांच्या वृत्तानुसार दीपकचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत एका झुडपात आढळ्याची माहिती तापासादरम्यान समोर आली आहे.