मुंबई,दि.४ : प्रतिनिधी मुंबई आणि महानगरात सुरु असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कायमच नवनवीन विक्रम रचले आहे. अशावेळी कल्याण-तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या कामादरम्यान एक अनोखा विक्रम रचण्यात आला आहे. देशातील सर्व महानगरांमध्ये सुरु असणाऱ्या मेट्रो कामांमध्ये मेट्रो १२ने डिसेंबर या केवळ एका महिन्यात ३७ पाइल कॅप उभारण्याचा अनोखा विक्रम केला आहे. देशभरात आजपर्यंतचा विक्रम हा ३५ पाइल कॅप उभारून करण्यात आला आहे, असा अंदाज हा विक्रम शेअर करत सोशलमिडीया शेअरकर्त्यानी वर्तविला आहे.
'कल्याण ते तळोजा' 'मेट्रो मार्ग १२' हा एकूण २३.७ किमी लांबीचा असून या मार्गावर १९ स्थानके आहेत. या उन्नत मार्गाचा शुभारंभ झाल्यावर लगेचच पायलिंगच्या कामाला सुरुवात झाली. ही मेट्रो मार्गिका मुंबई महानगर प्रदेशातील दक्षिण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई, विरार, मीरा-भाईंदर शहरांना जोडते. या मेट्रो मार्गांच्या एकत्रित प्रगतीमुळे महामुंबई मेट्रोचे जाळे अधिक विस्तारणार असून त्याचा लाखो प्रवाशांना फायदा होईल. या मेट्रो प्रकल्पांमुळे येणाऱ्या वर्षात एमएमआर क्षेत्रातील वाहतूक पायाभूत सुविधा अधिक बळकट होईल. या मेट्रो मार्गाचे ४% स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. मार्गिकेला आवश्यक असणाऱ्या निळजे डेपोच्या जमीनीचे अंशत: अधिग्रहण झाले असून उर्वरीत भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.