मूळचा पाकिस्तानी मोहम्मद २५ वर्षांपासून तेलंगणात करतोय वास्तव्य, खलिफा दहशतवादी संघटनेशी होते संबंध

श्रीलंकेला जात असताना विमानतळावरून पोलिसांनी केली अटक

    31-Jan-2025
Total Views |
 
Khalifa Terrorist
 
हैदराबाद : पाकिस्तानी दहशतवादी संघटना खलिफाशी (Khalifa Terrorist) संबंधित असलेल्या एका व्यक्तीला श्रीलंकेला जाण्याच्या प्रयत्नामध्ये चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रनेने या प्रकरणातील एकूण परिस्थिती जाणून घेण्यासाठी ताब्यात घेतले आहे. दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असणाऱ्या मोहम्मद जक्रीयाचे तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात हनमकोंडामध्ये बिर्याणीचे हॉटेल आहे. तो मूळचा पाकिस्तानी असल्याची माहिती आता समोर आली आहे.
 
मोहम्मद जक्रीया हा गेल्या २५ वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहे. तो सुरुवातीला आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये स्थायिक झाला. त्यानंतर तो आता वारंगल जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून वास्तव्य करत आहे. त्याने १०-१२ लोकांना खलिफा या दहशतवादी संघटनेसोबत जोडले आहे. त्यांचा आधार घेत त्याने हॉटेल व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. तसेच त्याचे मिठाई आणि आईस्क्रीमच्या १६ ट्रॉली वाहने वापरले जात आहे.
 
 
 
जक्रीया हा खलिफा या दहशतवादी संघटनेचा भारतीय प्रमुख असल्याचे अधिकाऱ्यांचा तर्क आहे. खलिफाच्या नेत्याच्या नुकत्याच झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो नवीन नेत्याची निवड करण्यासाठी मेळाव्यामध्य सहभागी झाला होता. चैन्नई विमानतळावरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 
दरम्यान, जक्रीया आपल्या दोन भावांसह हनुमानकोंडामध्ये वास्तव्यास असून त्याला दोन पत्नी आणि दहा मुले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता खलिफा या दहशतवादी संघटनेशी असलेल्या संबंधांमुळे त्याचा कसून तपास सुरू आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121