शेअर बाजार कोसळला! ७२१ अंशांची घसरण

एनएसईतही जोरदार घसरण

    03-Jan-2025
Total Views |
 
 
ेपोीा
 
 
 
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीला दाखवलेल्या तेजीने गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार कोसळला. ७२१ अंशांनी कोसळत ७९, २२३ अंशांवर बंद झाला. एनएसई मध्येही जोरदार घसरण होत, १८३ अंशांनी पडून २४,००४ अंशांवर बंद झाला. परदेशी गुंतवणुकदारांकडून जोरदार विक्रीचे सत्र सुरु राहिल्यामुळे शेअर बाजाराची ही पडझड झाली आहे.
 
 
झोमॅटो, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, टीसीएस, आयसीआयसी बँक, एलएनटी, एचसीएल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. या पडझडीतही बाजाराला सावरण्याचे काम टाटा मोटर्स, नेस्टले, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन या कंपन्यांच्या शेअर्सनी बाजाराला सावरले.
 
 
रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण हा मोठ्या चिंतेचा विषय ठरत असल्यामुळे बाजाराला त्याचा मोठा फटका बसतोय. त्यातून ट्रम्प प्रशासनाचे निर्णय आणि खनिज तेलांच्या किंमती वाढण्याची शक्यता यांचेही सावट बाजारावर आहे.