'एक किडे को मार दिया लेकीन..'; 'पाताल लोक २'चा लक्षवेधी टीझर प्रदर्शित
03-Jan-2025
Total Views |
मुंबई : अभिनेता जयदीप अहलावत याची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'पाताल लोक २' वेबसीरिजचं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. आता बहुचर्चित 'पाताल लोक २' चा लक्षवेधी टीझर प्रदर्शित झाला असून उत्कंठा वाढवणारी कथा असणार असे टीझरवरुन दिसून येत आहे.
'पाताल लोक २'च्या टीझरमध्ये हाथी राम चौधरी (जयदीप अहलावत) एका लिफ्टमध्ये प्रवेश करतो. त्या लिफ्टमधील P हे बटण हाथी राम दाबतो. लिफ्ट खाली जाते. तसं हाथी राम एक गोष्ट सांगायला सुरुवात करतो. गावातील एका व्यक्तीला किड्यांचा त्रास होतो. सर्व वाईट गोष्टी या किड्यांमुळे निर्माण होतात असं त्या व्यक्तीचं म्हणणं असतं. पुढे एक किडा त्या व्यक्तीला चावतो. परंतु तो व्यक्ती धाडसाने किड्याला मारतो. त्यामुळे एका रात्रीत तो व्यक्ती गावात लोकप्रिय होईन जातो. अगदी गावकरी त्याला डोक्यावर बसवतात. तो व्यक्तीही पुढचे काही दिवस सुखाची झोप घेतो. एका रात्री त्याच्या बेडखालून आवाज येतो. त्याला एक किडा दिसतो. पुढे हे किडे वाढत जातात. लाखोंट्या घरात किडे तिकडे दिसतात. एक किडा मारला म्हणजे सर्व संपलं असं ‘पाताल लोक’ मध्ये होत नाही. असं म्हणत हाथी राम चौधरी गोष्ट संपवतो. त्यामुळे नेमकी ही कथा काय सांगू पाहते हे पाहण्यासाठी १७ जानेवारीपासून प्राइम व्हिडीओवर प्रसारित होणारी पाताल लोक २ वेब सीरूज नक्की पाहा.