अंतराळातून महाकुंभ कसे दिसते? NASA ने शेअर केला डोळे दिपावणारा फोटो!

    27-Jan-2025
Total Views | 102

mkmb 1

नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभने अवघ्या जगाचे लक्ष्य वेधून घेतले आहे. कोट्यवधी भाविकांचा हा मेळावा कायमच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. सनातन धर्माच्या भव्यतेचे दर्शन घेण्यासाठी देशविदेशातील भाविक इथे एकवटतात. अशातच आता महाकुंभ अंतराळातून कसा दिसतो याचं एक अत्यंत देखणं चित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट आणि सुनिता विलियम्स इंटरनॅशन्ल स्पेस स्टोशनमध्ये वास्तव्य करत असून, अंतराळातून महाकुंभ कसा दिसतो याचे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. आपल्या X हँडलवर फोटो शेअर करत पेटिट म्हणाले की "महाकुंभ हा जगातला सर्वात मोठा मेळावा असून, आपला भवताल प्रकाशमान करणार आहे." त्यांच्या या फोटोमध्ये असे दिसून येत आहे की महाकुंभचा उत्सव जिथे साजरा केला जातोय ती प्रयागनगरी उजळून निघाली आहे. त्याचबरोबर सर्व आवश्यक त्या संसधनांनी परिपूर्ण अश्या नगरीचं दर्शन भाविकांकडून घेतलं जात आहे. महाकुंभचे छायाचित्रकार डॉन पेटिट आपल्या अॅस्ट्रोफोटोग्राफीसाठी सुद्धा ओळखले जातात. इंटरनॅशन्ल स्पेस स्टोशन पृथ्वीपासून ४०० किमी उंचीवर असून २८,००० किमी प्रति तास वेगाने पृथ्वीभोवती फिरते. पृथ्वीच्या प्रतिमा टिपण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरांचा वापर केला जातो. अंतराळातून आपली पृथ्वी, इथले देश, त्यातील वन्यजीवन कसे दिसते यासाठी त्या अत्याधुनिक कॅमेरांचा वापर केला जातो.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121