अमेरिकेच्या धोरणांचा फटका, सोन्याच्या किंमतीत होणार वाढ ?

मुंबईत सोने ८० हजारांच्या पार

    27-Jan-2025
Total Views |

 

 
gol
 
 
 
 
 
मुंबई : अमेरिकेच्या आर्थिक धोरणांचा फटका सोने आणि चांदी सारख्या मोल्यवान धातूंच्या किंमतींना बसण्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोन्याच्या किंमतींत एक टक्क्याने वाढ होत आहे. फक्त सोनेच नाही तर चांदी सारख्या मौल्यवान धातूंच्या किंमतींत वाढ होताना दिसत आहे. भारतातील या वाढत्या किंमतींमागे अमेरिकेतीस ट्रम्प प्रशासनाची धोरणे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे सशक्त होणे या गोष्टीचा प्रभाव येणाऱ्या काळात सोने चांदी यांच्या किंमतींवर जाणवेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
 

ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे डॉलरची किंमत घसरत चालली असून त्याचा रुपयाच्या किंमतीला बळ मिळत आहे. जानेवारी महिन्यात जवळपास ८७ रुपयांपर्यंत खाली घसरत ऐतिहासिक तळ गाठला होता. परंतु डॉलरमधील घसलरणीने रुपया वधारला असून त्यात ०.५० पैशांची वाढ झाली आहे. रुपयाची किंमत ८६.६२ वरु ८६.१६ पैशांवर आली आहे. भारतासाठी हे समाधान कारक चित्र आहे.

 

मुंबईतील सोन्याची किंमत प्रती तोळा ८०,२५० रुपयांवर पोहोचली आहे. अवघ्या ६ दिवसांत ही किंमत तब्बल २ हजार रुपयांनी वाढली. २० जानेवारी रोजी हीच किंमत ७८,७६० रुपयांपर्यंत होती . चांदीच्या दरांमध्येही चांगली वाढ होत, ९० हजारांचा टप्पा ओलांडत किलोमागे ९१ हजार ७४० रुपये इतकी किंमत पोहोचली आहे. सातत्याने वाढणाऱ्या किंमती, आता स्थिरावतील अशी आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.