दावोसमध्ये एमएमआरडीएने केले ४० अब्ज डॉलर्सचे करार

सुवर्ण महोत्सवी वर्षांत ११ सामंजस्य करारांवर केली स्वाक्षरी

    24-Jan-2025
Total Views |

mmrda



मुंबई, दि. २४ : विशेष प्रतिनिधी 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनी ऐतिहासिक कामगिरी करत स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित प्रतिष्ठित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ३.५ लाख कोटी रुपये गुंतवणुकीसह ११ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करत आर्थिक भरारी घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत हे महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. या गुंतवणुकींमुळे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) पायाभूत सुविधांच्या विकासात आमूलाग्र बदल होणार आहे. शहरी वाहतूक, प्रादेशिक विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये होणारी ही गुंतवणूक पुढील ३ ते ५ वर्षांत आर्थिक वाढीचा आणि जीवनमान सुधारण्याचा भक्कम आधारस्तंभ ठरणार आहे.
एमएमआरडीएने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून गुंतवणूकदारांसाठी जागतिक स्तरावर महत्त्वाचे केंद्र असल्याचे सिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, जागतिक दर्जाची परिवहन प्रणाली, तसेच उदयोन्मुख लॉजिस्टिक्स आणि डेटा सेंटर हब्स यांसारख्या मजबूत पायाभूत सुविधांच्या नेटवर्कसह, मुंबई महानगर प्रदेशात वाढ आणि इनोव्हेशनसाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या कामाचे कौतुक केले.

"दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममुळे मुंबई महानगर प्रदेशासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे. एमएमआरला ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट यामध्ये सामावले आहे. या भागीदाऱ्यांमुळे केवळ पायाभूत सुविधांचा विकास होणार आहेच, त्याचप्रमाणे या प्रदेशातील रोजगार निर्मिती आणि आर्थिक शाश्वततेलाही चालना मिळेल. एमएमआरडीएच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करताना, हा खऱ्या अर्थाने 'विकासाचा उत्सव' आहे."

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

"दावोस येथे एमएमआरडीएने केलेले करार हे मुंबईची विकासक्षमता आणि संधी यावर जागतिक गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतीक आहेत. या भागीदाऱ्यांमुळे आर्थिक गुंतवणूक होईलच, त्याचप्रमाणे जागतिक दर्जाचे कौशल्य आणि तंत्रज्ञानही येथे येईल.या उपक्रमामुळे एमएमआर ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाच्या समीप नेले आहे."

- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष एमएमआरडीए

दावोस येथे ४० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे करार होणे हा हा एमएमआरडीएसाठी ऐतिहासिक टप्पा आहे. नीती आयोग आणि महाराष्ट्र सरकारने ठरवलेल्या उद्दिष्टांशी हे करार सुसंगत आहे. पायाभूत सुविधा, नवीन विकास केंद्रे आणि सर्क्युलर इकॉनॉमी पार्कसारख्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये टारगेटेड गुंतवणुकींमुळे मुंबई महानगर प्रदेश २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करेल आणि ३० लाख रोजगार निर्माण करेल.

- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए


महत्त्वाचे सामंजस्य करार

१) कंपनीचे नाव : क्रॉसरेल इंटरनॅशनल (यूके) + यूके वाहतूक विभाग
सामंजस्य करार : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक पायाभूत सुविधांचा विकास आणि कार्यक्षमतेतील सुधारणा
एकूण गुंतवणूक : धोरणात्मक अभ्यासासाठी सहाय्य

२) कंपनीचे नाव: यूनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम सेंटर फॉर रेल्वे रिसर्च अँड एज्युकेशन, यूके
सामंजस्य करार : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) शाश्वत शहरी वाहतूक साध्य करणे
एकूण गुंतवणूक: धोरणात्मक अभ्यासासाठी सहाय्य

३) कंपनीचे नाव: ब्रुकफिल्ड कॉर्पोरेशन (कॅनडा)
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक: १२ अब्ज डॉलर्स

४) कंपनीचे नाव: ब्लॅकस्टोन इन्क. (यूएसए)
सामंजस्य करार: शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशाततील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक: ५ अब्ज डॉलर्स

५) कंपनीचे नाव : टेमासेक कॅपिटल मॅनेजमेंट पीटीई लिमिटेड (सिंगापूर)
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे.
एकूण गुंतवणूक : ५ अब्ज डॉलर्स

६) कंपनीचे नाव : सुमिटोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (जपान)
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे.
एकूण गुंतवणूक : ५ अब्ज डॉलर्स
७) कंपनीचे नाव : हिरानंदानी ग्रुप (भारत + दुबई)
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक: ६ अब्ज डॉलर्स

८) कंपनीचे नाव : के. रहेजा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड (भारत + सिंगापूर)
सामंजस्य करार: शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक : ५ अब्ज डॉलर्स

९) कंपनीचे नाव: एव्हरस्टोन ग्रुप (सिंगापूर)
सामंजस्य करार: शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक : १ अब्ज डॉलर्स

१०) कंपनीचे नाव : सोतेफिन भारत प्रायव्हेट लिमिटेड (भारत + स्वित्झर्लंड)
सामंजस्य करार: एमएमआरमध्ये पार्किंग सोल्यूशन्समध्ये बदल घडवून आणण्यासाठी थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक : १ अब्ज डॉलर्स

११) कंपनीचे नाव : एमटीसी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड + मित्सुई (भारत + जपान)
सामंजस्य करार : मुंबई महानगर प्रदेशात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क विकसित करणे
एकूण गुंतवणूक : सर्क्युलर इकॉनॉमी सहाय्य