बोरीवलीत सादर होणार शिवराज्याभिषेक सोहळ्याचा रंगमंचीय आविष्कार

    02-Jan-2025
Total Views |

image
 
बोरिवली : भाजपा पश्चिम महाराष्ट्र आघाडी, चारकोप कल्चरल अँड स्पोर्टस् फाऊंडेशन व जन मित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक रंगमंचीय आविष्कार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० ते रात्री १० या कालावधीत ‘जन. अरुणकुमार वैद्य मैदान, नवीन एम. एच. बी कॉलनी, सायली शाळेसमोर, बोरिवली पश्चिम’ येथे हा कार्यक्रम होणार आहे. इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते रविराज पराडकर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. बोरीवलीत १४ वर्षानंतर हा कार्यक्रम सादर होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यांत साठविण्यासाठी सहपरिवार उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांमार्फत करण्यात आली आहे.