मुंबई, "संत मुक्ताबाई म्हणजे साक्षात परमेश्वाराचा अंश होत्या. त्यांनी आपल्या मृतवत समाजाला नवसंजीवनी दिली." असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री, निवेदिका आरती मुनिश्वर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, प्रमुख कार्यवाह उमा आवटे पुजारी व उपाध्यक्ष दिपाली काळे उपस्थित होते.
दि. २० जुलै रोजी, डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थान येथील विनायक सभागृह येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा डोंबिवलीच्या माध्यमातून ब्रम्हचित्कला मुक्ताई या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी आरती मुनिश्वर यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून संत मुक्तबाईंच्या जीवनगाथेवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या कुटुंबाचा समृद्ध पट लोकांसमोर ठेवला. कृष्णभक्तीची परंपरा, माऊलींच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंग यावेळी त्यांनी लोकांसमोर मांडले. संत मुक्ताबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकताना त्या म्हणाल्या की मुक्ताई या साक्षात आदीशक्ती आणि मूळमायाच होत्या. त्यांच्या ताटीच्या अभंगांचे गूढ आज सुद्धा कित्येकांच्या मनावर आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुरेश देशपांडे म्हणाले की " महाराष्ट्राची भूमी ही वैचारिक भूमी आहे. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीने विचारांचा एक समृद्ध वारसा आपल्याला दिला."
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.