१ जानेवारीपासून जन्माला येणारी मुले ठरणार Generation Beta चा हिस्सा
01-Jan-2025
Total Views | 64
नवी दिल्ली : नवीन वर्ष २०२५ पासून जन्माला येणारी मुले नव्या जनरेशनचा ( Generation ) म्हणजेच Generation Beta चा हिस्सा होणार आहेत. आतापर्यंत Gen Z, Alpha ही नावे आपण ऐकली आहेत. आता तिच्या पुढची जनरेशन या नववर्षापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे.
जगात वेळोवेळी नवीन माणसे जन्म घेत असतात, ज्यांना आपण वेगवेगळ्या पिढ्यांनी ओळखतो. जसे की, Gen Z, Alpha या पिढ्या अस्तित्वात आहेत. आता Generation Beta ही नवी पिढी समोर येत आहे. १ जानेवारी २०२५ पासून जन्माला येणारे प्रत्येक मूल हे जनरेशन बिटा या पिढीत मोजल्या जाणार आहे. सामाजिक संशोधक मार्क मैंक्रिडल यांच्या अनुसार या नव्या पिढीपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. या पिढीतील मुले ही तांत्रिकदृष्ट्या म्हणजेच स्मार्टफोन, रोबोट आणि एआयसोबत विकसत होणार आहेत.
२०२५ ते २०३९ मधील मुलांना बिटा किड्स या नावाने ओळखले जाणार आहे. या मुलांचा शिकण्याचा, खेळण्याचा व जगण्याचा प्रवास हा वेगळा असणार आहे. त्यांच्यासमोर सोईस्कर जीवनासोबतच अनेक नवीन समस्यादेखील निर्माण होणार आहेत.