'धर्मवीर २' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
28-Sep-2024
Total Views |
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट नुकताच मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित-लिखित या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यात अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत तर अभिनेता क्षितिज दाते माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसत आहेत.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 'धर्मवीर २' या चित्रपटाने १.६५ कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांची चित्रपटगृहात गर्दी पाहायला मिळाली होती. धर्मवीर १ प्रमाणे दुसराही भाग हिट होईल अशा अपेक्षा आहे. तसेच, लवकरच धर्मवीर ३ देखील येणार असून त्यात २०२२ साली महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्याची बाजू दिसणार असे सांगितले जात आहे.